Rain esakal
जळगाव

Jalgaon Weather Forecast : जिल्ह्यात आजपासून वाऱ्यासह पावसाचा अंदाज! वाऱ्याचा वेग राहणार 35 ते 40 किलोमीटर प्रतितास

Jalgaon News : ९ ते १० जूनपासून वाऱ्याची गती बरीच मंदावेल व तापमान २ ते ३ डिग्रीने घसरेल, असा अंदाज ‘वेलनेस वेदर’चे संचालक, हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Weather Forecast : जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवार (ता. ४)पासून ते ८ जूनदरम्यान वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग कमाल ताशी ३५ ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी बहुतांशी सायंकाळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे.

९ ते १० जूनपासून वाऱ्याची गती बरीच मंदावेल व तापमान २ ते ३ डिग्रीने घसरेल, असा अंदाज ‘वेलनेस वेदर’चे संचालक, हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तविला आहे. या घडामोडी पेरणीयोग्य नाहीत. त्यामुळे पेरणीचा निर्णय घाईत घेऊ नये. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Jalgaon Forecast of rain with wind in district from today)

असहय्य घामाच्या धारा

गेल्या दोन दिवसांपासून तापमान पुन्हा वाढले असून, दुपारी उन्हाची तीव्रता कमी असली, तरी दमट वातावरण आहे. यामुळे अंगाला घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत तहान लागते. गेल्या ३० मेपासून रात्री गारवारे वाहत होते. तेही बंद झाले आहेत. यामुळे रात्री मिळणारा गारवाही आता मिळेनासा झाला आहे. (latest marathi news)

शेतकऱ्यांचा पावसाची प्रतिक्षा

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीची तयार पूर्ण केली आहे. काही ठिकाणी बागायतदार शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. कोरडवाहू शेतकरी मात्र पावसावर अवलंबून असल्याने ते पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. ‘केव्हा एकदाचा दमदार पाऊस पडतो, अन्‌ आम्ही पेरण्या करतो’, असे चित्र सध्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT