Former Guardian Minister Dr. Satish Patil
Former Guardian Minister Dr. Satish Patil esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकरी-व्यापारी हितासाठी बाजार समिती कटिबद्ध; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलेला शब्द आजवर अमलात आणला. तसेच, तामसवाडी (ता. पारोळा) येथे उपबाजार समिती सुरू करून त्या परिसरातील शेतकऱ्यांना उपबाजार समितीच्या माध्यमातून होणारा लाभ हा महत्वपूर्ण असून, येणाऱ्या काळात उपबाजार समितीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. शेतकरी व व्यापारी हितासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा सभापती डॉ. सतीश पाटील यांनी केले.(Jalgaon Former Guardian Minister Dr Satish Patil statement Market committee committed to farmers trade interests)

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे उपबाजार समितीच्या ५० मेट्रिक टन क्षमता असलेल्या इलेक्ट्रॉनिक भुईकाटा पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती सुधाकर पाटील, बाजार समिती संचालक डॉ. हर्षल माने, ज्येष्ठ संचालक नगराज पाटील, मनोराज पाटील, रवींद्र पाटील, बबनराव पाटील, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश पाटील, संभाजी पाटील.

निंबा पाटील, सुरेश वंजारी, अनिल मालपुरे, जितेंद्र शेवाळकर राजेंद्र मराठे, सचिव दीपक मोरे, तामसवाडीचे माजी सरपंच हिरामण पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ. शांताराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. आर. बी. पाटील, शहराध्यक्ष अशोक मराठे.

सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रमोद पवार, ग्रा. पं. सदस्य शिवाजी पवार, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अशोक मराठे, ललित सोनवणे, महेश भोई, लोकेश पवार यांच्यासह कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसभापती सुधाकर पाटील व माजी उपनगराध्यक्ष वर्षा पाटील यांनी सपत्नीक काटापूजन केले. (latest marathi news)

डॉ. हर्षल माने यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, आमच्या काळात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला जात आहे. प्रा. आर. बी. पाटील, संतोष महाजन यांनी उपबाजार समितीचा फायदा शेतकरी, व्यापाऱ्यांना होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी तारांबळ थांबणार असल्याचे सांगितले. संतोष महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संचालक मनोराज पाटील यांनी आभार मानले.

उपबाजार समितीमुळे गैरसोय दूर

उपबाजार समितीचा शुभारंभ झाल्यामुळे परिसरातील तामसवाडी, करमाड खुर्द, करमाड बुद्रुक, सावखेडा, रताळे, आडगाव, तरवाडे, शिवरे दिगर, बोळे, ढोली, वेल्हाणे, मुंदाणे, आडगाव या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेत जास्तीत जास्त मालाला भाव देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

लिलावात शेतकऱ्यांचा सहभाग

उपबाजार आवारात लिलावासाठी तब्बल २५ ते ३० वाहने आली होती. ज्वारीला २३९१, गहू २५००, दादर २८००, बाजरीला २६०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव देण्यात आला. उपबाजार समिती सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती संचालक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT