Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : ‘भिशी’ च्या नादात 13 गृहिणींना दांपत्याने लावला 55 लांखाचा चुना

Jalgaon Fraud Crime : योगेश्वर नगर भागातील रहिवासी दाम्पत्याने परिसरातील गृहिणीसह नागरिकांकडून दर महिन्याला खासगी भिशीची रक्कम गोळा करून गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : योगेश्वर नगर भागातील रहिवासी दाम्पत्याने परिसरातील गृहिणीसह नागरिकांकडून दर महिन्याला खासगी भिशीची रक्कम गोळा करून गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सविता व संजय धोंडू सोळंखे या दाम्पत्याने ५५ लाखांचा चुना लावत पळ काढल्याची तक्रार संबंधितांनी तालुका पोलिसांत दिली आहे.

शहरातील गिरणा पंपिंग रोड, कोल्हे हिल्स परिसरात योजना नगरातील महिलांकडून सविता सोळंखे या महिलेने दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने रक्कम जमा केली.(fraud couple stolen worth 55 lakhs to 13 housewives)

यातील पैसे देणाऱ्या काही महिलांच्या भिशी लागल्या. मात्र पैशाचे काम असल्याने पुढच्या महिन्यात देते असे..सांगत ही रक्कम सविता सोळंखे यांनी स्वतःजवळ ठेवून घेतली आहे. या पैशांच्या मोबदल्यात तुम्हाला जास्त पैसे मिळतील, असे आमिष देखील या पती-पत्नीतर्फे दाखवण्यात आले. त्यानंतर महिलेचे सासरे आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून परिसरातील महिलांकडून या महिलेने उसनवारीने पैसे घेतले आहे.

बचत गटाच्या महिला..

फसवणूक झालेल्या महिलांचा बचत गट देखील आहे. त्यांच्या नावाने बचत गटाच्या माध्यमातून कर्ज तर घेतलेच शिवाय काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढून ती रक्कमही सोळंखे या महिलेने घेतली.

प्रत्येक वेळी आजार किंवा इतर कोणत्याही कामाच्या बहाण्याने ही महिला रक्कम घेऊन महिलांची फसवणूक करत होती. परिसरातील तब्बल १३ महिलांकडून घेतले सुमारे ४१ लाख वेळोवेळी कुठल्या न कुठल्या कारणाने उकळून गडप केले.

या महिलांची तक्रार

पल्लवी ठोसर (वय ३९, रा. योजना नगर) या महिलेकडून सविता सोळंखे यांनी सुमारे १३ लाख ४६ हजार २०० रुपये घेतले आहे. या शिवाय इंदूबाई डोंगर डोळे, मीनाबाई संदीप पाटील, सोनाली संतोष जलंकार, गायत्री प्रदीप बानाईत, ज्योती विलास सरवादे, सिंधूबाई जगन्नाथ पारधे, लक्ष्मी श्यामकांत तायडे.

अनिता हेमराज सोनवणे, आशा सुनील लोखंडे, आशा अशोक सोनवणे, अश्विनी तुषार गायकवाड, कोकिळाबाई प्रकाश पाटील (सर्व रा. योजनानगर) यांच्याकडून ४१ लाख ७६ हजार ८० रुपये असे एकूण सर्व महिलांना ५५ लाख रुपयात गंडवल्याचे हिशेबावरुन समोर आले. यासंदर्भात तालुका पोलिसांत या महिलांनी तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT