Dogs (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावला कुत्र्यांच्या निर्बीजीकरण, उपचारात झोल

Jalgaon : शहरातील मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी नंदुरबारच्या नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला ठेका आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी नंदुरबारच्या नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला ठेका आहे. मात्र, संबंधित केंद्रातील उपाय योजनांसंदर्भात तक्रारीवरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पॉट व्हिजिट सह चौकशीच्या सूचना केल्या. त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने संस्था, ठेकेदारांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (Jalgaon fraud in Sterilization and treatment of dogs in Jalgaon)

सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव महापालिकेने नंदुरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला ठेका दिला आहे. मात्र तेथे प्राण्यांना क्रूरतेने वागवले जाते. असे चौकशीत पुढे आले.

संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम अनिल शिरसाठ यांच्या २६ डिसेंबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ कारकिर्दीतील कामकाजाबाबत डॉ. अनिल शिंदे, भादलीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.मनीष बाविस्कर , जळगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.नीलेश चोपडे यांच्या पथकाने चौकशी केली.

विना परवाना बेकायदेशीर केंद्र

चौकशीत, बरेच पिंजरे हे तुटलेले, श्वानांना ठेवण्यास अयोग्य आहे. पिंजरे ठेवलेल्या खोल्यांत खेळती हवा नाही. कुत्र्यांसाठी पूर्ण वेळ पिण्याचे पाणी नाही. शस्त्रक्रियागार सुविधा नाहीत. रेकॉर्ड तपासणीत, शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांना किमान चार दिवस औषधोपचार करणे आवश्यक असताना तिसऱ्याच दिवशी मोकाट सोडून दिल्याचे आढळले. (latest marathi news)

अँनीमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून प्रकल्प मान्यता प्रमाणपत्र सहा महिन्यात घेणे आवश्यक असतांना, प्रमाणपत्र न घेताच केंद्र सुरु ठेवले आहे. आदी आरोप चौकशी समितीने ठेवले आहे.

निर्बीजीकरणाचा झोल...

भेटीच्या वेळी आदल्या दिवशी २६ शस्त्रक्रियांची नोंद असून सीसीटिव्ही फुटेज क्रमांक १ मध्ये १५ शस्त्रक्रिया केल्याचे आढळले. उर्वरित शस्त्रक्रियाचे फुटेज क्रमांक २ मध्ये उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते फुटेज अस्पष्ट होते.

परिणामी नवसमाज बहुउद्देशीय संस्थेचे प्रकल्प संचालक (प्रोजेक्ट डायरेक्टर) गौतम अनिल शिरसाठ यांच्या विरुद्ध चोपडा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गौतम अनिल शिरसाठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT