heart care  esakal
जळगाव

Jalgaon News : लहान मुलांच्या हृदयाला छिद्र, चिंता नको; शहरातील 94 बालकांची मोफत 2 डी इको तपासणी

Jalgaon News : लहान वयात मुलांना थकवा येत असेल, त्याला धाप लागत असेल, थोडावेळ खेळला असेल, की तो दमत असेल, तर त्याच्या हृदयाला लहानपणापासूनच छिद्र असल्याचे निदान होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लहान वयात मुलांना थकवा येत असेल, त्याला धाप लागत असेल, थोडावेळ खेळला असेल, की तो दमत असेल, तर त्याच्या हृदयाला लहानपणापासूनच छिद्र असल्याचे निदान होऊ शकते. यासाठी खर्चही अधिक येतो. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांच्या पाल्यांनी घाबरून न जाता मुलाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात मदत मिळते आणि त्या बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया मोफत होते. (Free 2D echo checkup of 94 children in city )

शहरातील २९ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिर झाले. त्यातील दोन बालकांवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया झाली. जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमार्फत मोफत २ डी इको शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील ० ते १८ वर्षापर्यंतच्या शाळा व अंगणवाडीतील ९४ बालकांची मोफत २ डी इको तपासणी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास व डॉ. सोनिया कारापूरकर (इंटरवेंनशल पेड्राट्रिक कार्डिओलाजिस्ट) यांनी तपासणी केली.

२९ बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. २५ बालकांचा पाठपुरावा घेण्यात येणार आहे. ३७ बालकांची स्थिती सर्वसाधारण आहे. औषधपचारासाठी २ मुले संदर्भित आहेत. ० ते १८ वयेागटातील बालकांना लहानपणापासून हृदयाला छिद्र असतात. त्याचा थेट हृदयावर परिणाम होऊन बालकांना हृदयाच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. (latest marathi news)

मात्र, काही पालक त्यांच्या बालकांच्या हृदयाला छिद्र असले, तरी शस्त्रक्रिया विविध कारणांमुळे करीत नाही. त्यातील मोठे कारण खर्च असतो. त्यामुळे बालकांना वरील प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. आता जिल्हा रुग्णालयात ‘जलद हस्तक्षेप सेंटर’मध्ये बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात येते व उपचारही होतात. त्यावर शस्त्रक्रियाही होते.

''० ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या हृदयाला छिद्र असेल तर त्यांच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयातील जलद हस्तक्षेप केंद्रात तपासणी करून घ्यावी. या बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी शासन मदत करते.''-वर्षा वाघमारे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT