Jalgaon fruit crop insurance Compensation sakal
जळगाव

जळगाव : फळपीकविम्याची '३०२ कोटी' रुपयांची भरपाई

पुनर्रचित हवामानावर आधारित मृग, आंबिया बहार योजनांचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीकविमा योजना २०२१-२२ या वर्षात लागू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबईच्या माध्यमातून जिल्ह्यातील मृग व आंबिया बहारासाठी फळपिकांसाठीची ३०२ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला. या अनुषंगाने कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या वेळी गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, आत्मा समितीचे प्रमुख मनोहर चौधरी, जिल्हास्तरीय कृषी समितीचे अध्यक्ष हितेश आगीवाल, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजना २०२१-२२; २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठी लागू करण्यात आलेली आहे. यात १८ जून २०२१ च्या शासकीय निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी नवीन निकष जारी करण्यात आले आहेत. यानुसार कमी तापमान या निकषाच्या अंतर्गत १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीच्या दरम्यानच्या कालावधीत सलग तीन दिवसांपर्यंत किमान तापमान आठ अंश सेल्सिअस वा त्यापेक्षा कमी राहिल्यास हेक्टरी नुकसानभरपाई २६ हजार ५०० रुपये (कमाल नुकसानभरपाई २६ हजार ५०० रुपये) देय राहणार आहे.

वेगाचा वारा या निकषाच्या अंतर्गत १ मार्च ते ३१ जुलैदरम्यानच्या कालावधीत ४० किलोमीटर प्रतितास वा त्यापेक्षा जास्त गतीने वारे वाहिल्याची नोंद हवामान केंद्रावर झाल्यास केळी आंबिया बहार पिकासाठी नुकसानभरपाई मिळेल. यात नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत ही माहिती कृषी विभाग व विमा कंपनीला कळविल्यानंतर पंचनामा पद्धतीन हेक्टरी कमाल ७० हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मिळेल.

नुकसानग्रस्त ५३७ शेतकऱ्यांना लाभ

या निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी, लिमिटेड, मुंबई यांच्या माध्यमातून आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे.

या योजनेत मृग बहारमध्ये लिंबू, पेरू, सीताफळ आणि मोसंबी पिकासाठी नुकसानग्रस्त ५३७ शेतकऱ्यांना ७७ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर होऊन थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली असून, आंबिया बहारमध्ये केळी पिकासाठी कमी तापमानाच्या निकषाच्या अंतर्गत १२७ कोटी, तर जास्त तापमानासाठी १७५ कोटी अशी एकूण ३०२ कोटी नुकसानभरपाई मंजूर होणार असल्याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार असून, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे.

शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसत असल्याने पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेतील लाभ वेळेत मिळणे आवश्यक होते. या अनुषंगाने पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होणार आहे.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT