Raksha Khadse  esakal
जळगाव

Jalgaon News : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार 327 कोटींचा लाभ; केंद्रीय राज्यमंत्री खडसे

Latest Jalgaon News : महसूल मंडलात सलग पाच दिवस तापमान ४५ अंश व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहार २०२३-२४ मधील फळपिकाच्या अनुषंगाने महावेध माहिती (डेटा)नुसार ऑक्टोबर ते मार्चमध्ये जिल्ह्यातील ८४ महसूल मंडलात सलग पाच दिवस तापमान ४५ अंश व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे. (Fruit crop insurance farmers will get benefit of 327 crores)

पूर्वी जानेवारीमध्ये सलग तीन दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली असून, असे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या एकूण नुकसान भरपाईची ३२७ कोटी ५५ लाख १५ हजार १८४ रुपये एवढी एकत्रित रक्कम काही दिवसांत जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी दिली. (latest marathi news)

भरपाईस पात्र तालुका व महसूल मंडले

भुसावळ : कुऱ्हे प्र. नशिराबाद, पिंपळगाव खुर्द, वरणगाव

बोदवड : बोदवड, करंजी, नाडगाव

चोपडा : अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र. अडावद, गोरगावले बुद्रुक, हातेड बुद्रुक, लासूर

जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी बुद्रुक, पहूर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकळी

मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, मुक्ताईनगर

रावेर : ऐनपूर, खानापूर, खिर्डी बुद्रुक, खिरोदे प्र. यावल, निंभोरा बुद्रुक, रावेर, सावदा

यावल : भालोद, बामणोद, फैजपूर, किनगाव बुद्रुक, साकाळी, यावल

अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, पातोंडा, शिरुड, वावडे

भडगाव : आमडदे, भडगाव, कजगाव, कोळगाव

चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातळे, खडकी बुद्रुक, मेहुणबारे, शिरसगाव, तळेगाव

धरणगाव : चांदसर बुद्रुक, धरणगाव, पाळधी बुद्रुक, पिंप्री खुर्द, साळवे, सोनवद बुद्रुक

एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगांव, उत्राण गुजर हद्द

जळगाव : असोदा, भोकर, जळगाव, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा

पाचोरा : गाळण बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, नगरदेवळे बुद्रुक, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बुद्रुक, वरखेडी बुद्रुक

पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बुद्रुक, तामसवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT