Police team with arrested suspect esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पेट्रोलपंप मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलिसांनी लावला छडा

Jalgaon Crime : जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापक रस्ता अडवून एक लाख ९३ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना रविवार(ता.१८) रोजी घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापक रस्ता अडवून एक लाख ९३ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना रविवार(ता.१८) रोजी घडली होती. गुन्ह्यातील संशयित जळगाव येथील असल्याच्या संशयावरून त्याचा शोध सुरु होता.

एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावून प्रमुख संशयिताला गुन्ह्यात वापरलेल्या रेसर बाईक सह अटक केली असून उर्वरित दोघांचे नावे निष्पन्न केले आहे.( gang that robbed petrol pump manager was exposed)

जामनेर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारी नुसार, रविवार(ता.१८) रोजी सांयकाळी सातच्या सुमारास पेट्रोलपंप व्यवस्थापक नीलेश रतन पवार (रा. जामनेर पुरा) हे त्रिवेणी पेट्रोलपंप शहापुरची रक्कम एकत्रित करून मोटर सायकलने जामनेरकडे येत होते.

जामनेर ते शहापूर रोडवरील बेल फाट्याजवळ लाल रंगाच्या मोटर सायकल (रेसर बाईक) वरून ट्रिपलसीट आलेल्या अनोळखी तरुणांनी पवार यांच्या दुचाकीसमोर आडवे लावून पवार यांना मारहाण करीत बॅगेत असलेले एक लाख ९३ हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने लुटून नेली होती.

या प्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यातील संशयित सुसाट रेसर बाईकने जळगावच्या दिशेने पळाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना कुसुंबा येथील गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून जामनेर लुटीतील संशयित कुसुंब्यात असल्याची माहिती मिळाली.

त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी अशांच्या पथकाने कुसुंबा येथून ऋशिकेष रमेश मावळे (रा. साईसिटी कुसुंबा) यास ताब्यात घेतले.

सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच संशयिताने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या दोन्ही साथीदारांची नावे पोलिसांना दिली. गुन्ह्यात वापरलेली केटीएम रेसर बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT