Ghats at the Tapi-Poorna esakal
जळगाव

Jalgaon News : तापी-पूर्णा संगमावरील घाट बनला धोकादायक; भाविकांसह पर्यटकांची गैरसोय

Jalgaon : श्रीक्षेत्र चांगदेव हे महाराष्ट्रात पर्यटनस्थळ आणि पुरातन देवस्थानांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे तापी पूर्णा नद्यांच्या संगमतीरी विविध धार्मिक विधी आणि पूजा होतात.

संदीप शिंपी

Jalgaon News : श्रीक्षेत्र चांगदेव हे महाराष्ट्रात पर्यटनस्थळ आणि पुरातन देवस्थानांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे तापी पूर्णा नद्यांच्या संगमतीरी विविध धार्मिक विधी आणि पूजा होतात. येथे बाराही महिने भाविकांची व पर्यटकांची वर्दळ असते. अशा या पवित्र संगमावर भाविक स्नान करण्यासाठी येत असतात. परंतु भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या घाटाच्या आंघोळीसाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या ढासळल्याने येथे पूरस्थितीत जीवितहानी होऊ शकते. याकडे पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (ghat at Tapi Purna confluence has become dangerous )

श्रीक्षेत्र चांगदेव येथे संत चांगदेव महाराज यांनी चौदाशे वर्षे तपश्चर्या केली आहे. येथे संत चांगदेव महाराजांचे हेमाडपंथी मंदिर हे एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. येथे तापी-पूर्णा नद्यांचा संगम असून, या नद्यांचा अथांग जलाशय आहे. त्यामुळे इथला परिसर सदैव नैसर्गिक सौंदर्याने नटलेला पाहावयास मिळतो.

या तापी-पूर्णा संगमावर आणि चांगदेव महाराजांच्या देवस्थानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील पर्यटक व भाविक दर्शनासाठी व अथांग जलाशयात नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. चांगदेव मंदिर व परिसर हे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, या ठिकाणी त्यांच्याकडून देखरेख केली जाते.

पूरस्थितीने ढासळतोय घाट..

येथे तापी-पूर्णा संगमाच्या नदी काठावर घाट बांधण्यात आला होता. त्या निकृष्ट प्रतीच्या पायऱ्या बांधण्यात आल्याचे समोर दिसत आहे. पायऱ्या बांधून सात ते आठ वर्षे झाल्याचे भाविक सांगतात. पायऱ्या अत्यंत लहान स्वरूपात बांधण्यात आल्या. त्या पायऱ्यांवर बसून अंघोळही करता येणार नाही. विशेष म्हणजे येथे पावसाळ्याच्या दिवसात दोघही नद्यांना बऱ्याच वेळा पूर येतो. (latest marathi news)

तापी नदी ही मध्य प्रदेशातून तर पूर्णा नदी ही विदर्भातून येत असते. मध्य प्रदेश आणि विदर्भात पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर या दोन्हीही नद्यांना पूर येतो व पाण्याचा प्रवाह हा ताकदीने येत असल्याने येथील स्नानघाटावर आदळला जातो. परिणामी या स्नानघाटाच्या पायऱ्या ढासळत आहे. छोट्या स्वरुपातील स्नानघाट निकृष्ट प्रतीचा असल्याचे दिसून येते.

...असे आहे देवस्थानाचे महत्त्व

श्रीक्षेत्र चांगदेव येथील तापी- पूर्णा नद्यांच्या संगमातीरी स्नानाचे खूप महत्त्व आहे. संगमतीरी विविध धार्मिक विधी आणि पूजा होतात. यात नारायण नागबळी, कालसर्प पूजा, त्रिपिंडी, दशपिंडी यासारख्या विविध धार्मिक पूजेसाठी बाराही महिने तापी-पूर्णा संगमातीरी भाविकांची व पर्यटकांची वर्दळ असते. अशा या पवित्र संगमावर भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येत असतात. परंतु भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या घाटाच्या आंघोळीसाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या खाली कोसळल्याने धोकादायक ठरू पाहात आहे.

सुरक्षितेबाबत हव्या उपाययोजना

पुरातत्त्व विभागामार्फत जो घाट बांधण्यात आला आहे, त्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. लोखंडी खांबही लावण्यात आलेले नाही. खांबांना लोखंडी साखळी लावलेली असल्यास भाविक सुरक्षित आंघोळ करू शकतात.

विस्तीर्ण घाट बांधण्याची मागणी

तापी-पूर्णाचा पवित्र संगम व पर्यटनस्थळ असूनही पुरातत्त्व विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. पायऱ्या बांधताना नदी किनाऱ्यापासून व मोठ्या स्वरूपात बांधण्यात याव्या, अशी मागणी होत आहे. पायऱ्या बांधताना फक्त पाण्याची पातळी पूर्ण असते, याचाच विचार करण्यात आला आहे. परंतु उन्हाळ्यात पाणीपातळी खोल जात असल्याने भाविकांना स्नान करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT