Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गिरड सामुहिक अत्याचार प्रकरण; डॉक्टरांसह पोलिसांना खंडपीठाची नोटीस

Jalgaon Crime : गिरड (ता. भडगाव) येथे ११ जानेवारी रोजी एका कुटुंबावर हल्लाकरुन महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : गिरड (ता. भडगाव) येथे ११ जानेवारी रोजी एका कुटुंबावर हल्लाकरुन महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. जखमी महिलेने पोलिसांना तिच्यावर अत्याचार झाल्याचे सत्य कथन केले असताना भडगाव पोलिसांनी केवळ हाणामारीची नोंद घेतली.

त्याच प्रमाणे २३ जानेवारी रोजी अत्याचारांचे कलम वाढवण्यात आली होती. पोलिसांचा हलगर्जीपणा आणि वेळीच वैद्यकीय तपासणी करण्यात का आली नाही यासाठी उच्च न्यायालयाने खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. (Girad Mass Atrocities Case )

पिडीतेने दिलेल्या निवेदनानुसार तिच्यावर ११ जानेवारी रोजी गावातीलच गुंडांनी अत्याचार केला होता. तक्रारदार महिलेने आपल्यावर सामुहिक अत्याचार झाल्याचे सांगूनही पोलिसांनी तक्रारीत अत्याचाराचा उल्लेख केला नाही.

तब्बल बारा दिवसानंतर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आली आहे, असे असताना पिडीतेची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना पोलिसांनी दखल न घेतल्याने पिडीतेने घटनेच्या दिवशीचे भडगाव पोलिस ठाण्याच्या सिसीटीव्ही फुटेजची मागणी केली.

तसेच तपासाधिकारी शेखर डोमाळे यांनी वेळीच संशयित श्रीराम कांबळे, गजानन कांबळे, राजू कांबळे विजय कांबळे यांना अटक केली नाही. आरोपींना फायदा व्हावा यासाठी विलंब करून पीडिता सांगत असल्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही.

पिडीतेने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली असून न्या. मंगेश पाटील, न्या. शैलेश ब्रह्मे यांच्या न्यायपिठाने पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक (जळगाव), तपासाधिकारी शेखर डोमाळे.

वैद्यकीय अधिकारी यांना कारणेदाखवा नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे. पुढील कामकाज ५ मार्च रोजी होणार असून पिडीतेच्या वतीने ॲड. भूषण महाजन कामकाज पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT