Mass Marriage esakal
जळगाव

Jalgaon Mass Marriage : मुलीच्या विवाहासाठी 10 हजारांचे अनूदान! शेतकरी, शेतमजुरांसाठी शुभमंगल सामूहिक विवाह

Jalgaon News : या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी शासनातर्फे शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी केले आहे. (jalgaon Grant of 10 thousand for girl marriage)

सामूहिक/नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रतिजोडपे दहा हजार अनुदान देण्यात येते. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थेस प्रतिजोडप्यामागे २ हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.

वधू जळगाव जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, शेतकरी असल्यास ७/१२ उतारा व शेतमजूर असल्यास भूमिहीन, शेतमजूर असल्याचा दाखला आवश्‍यक आहे. वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त असू नये, त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सोबत जोडावा. या योजनेचा लाभ खुला व इतर मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो.

या योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्याने ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. (latest marathi news)

सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करणारे जोडपे, बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकाऱ्यांसमोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामूहिक विवाह सोहळा आयोजन करणाऱ्या स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान ५ व कमाल १०० जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणीजवळ, जळगाव (०२५७-२२२८८२८) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT