railway station esakal
जळगाव

Jalgaon Banana News : निंभोरा रेल्वेस्थानकातून केळी वॅगनसाठी ‘ग्रीन सिग्नल’; 5 जूनपासून वाहतूक

Jalgaon : तालुक्यातील निंभोरा रेल्वेस्थानकातून केळीच्या रेल्वे वॅगन्स भरून दिल्ली येथे पाठविण्याचा निर्णय आता मार्गी लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Banana News : तालुक्यातील निंभोरा रेल्वेस्थानकातून केळीच्या रेल्वे वॅगन्स भरून दिल्ली येथे पाठविण्याचा निर्णय आता मार्गी लागला आहे. गेल्या बारा वर्षांपासून या रेल्वेस्थानकातून केळी वॅगन्स भरल्या जात नसल्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी हा निर्णय राखून ठेवला होता. तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वेस्थानकातून पुन्हा एकदा उत्तर भारतातील दिल्ली रेल्वेस्थानकावर रेल्वे वॅगन्समधून केळी भरून पाठविण्याचा निर्णय निंभोरा स्टेशन फळबागायतदार शेतकरी युनियनने घेतला आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भुसावळ येथे जाऊन त्याची माहिती दिली. ( Green Signal for Banana Wagon from Nimbhora Railway Station)

भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुमती दिली खरी परंतु त्यांना मुंबई येथील कार्यालयातून अनुमती मिळत नव्हती. गेल्या १२ वर्षांपासून येथील मालधक्क्यावरून केळी भरली जात नव्हती. म्हणून त्या धक्क्याची पाहणी मुंबईच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी करून मगच त्याबाबत अनुमती दिली आहे. याबाबतची अनुमती अधिकाऱ्यांनी आता लेखी पत्राद्वारे निंभोरा युनियनला कळविली आहे. (latest marathi news)

या कामी खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कडू चौधरी आणि संचालक किरण नेमाडे यांनी दिली. मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या अनुमतीमुळे आता येत्या पाच जून पासून निंभोरा येथील रेल्वे स्थानकातून केळी भरून दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. खासदार रक्षा खडसे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल केळी उत्पादकात समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT