satpura Jungle (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : सातपुड्याची हिरवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

Jalgaon : यावल वनविभागाच्या क्षेत्रात वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय होत नसल्याने सातपुडा वणव्यापासून सुरक्षित राहिला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दरवर्षी यावल वनविभागाच्या क्षेत्रात वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय होत नसल्याने सातपुडा वणव्यापासून सुरक्षित राहिला नाही, मात्र वनविभागाच्या हद्दीत वणवा लागल्याने यात वृक्षांची होळी होऊन कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचीही यानिमित्ताने राख सुरु आहे. शासकीय नियम फक्त कागदात बोलतात हेच खरे याचा अनुभव अशा अनेक घटनांतून समोर येतो. (Jalgaon News)

वने वाचवण्यासाठी वनविभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती व संबंधित भागातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. वन विभागाच्या माध्यमातून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या होत्या मात्र त्या समित्या कागदोपत्रीच राहिल्याचा प्रत्यय दिसून येतो आहे.

वनसंपदेचा ऱ्हास

सातपुडा पर्वतात लहान-मोठी झाडेझुडपे, हिरवेगार गवत, वृक्षवेली असल्याने डोंगरावर ससे, तरस, माकड, लांडगा, कोल्हे, रानडुक्कर, लांडोर, मोर, या सारख्या लहान-मोठ्या प्राण्यांचा वावर असतो.

मात्र वणव्यामुळे जंगलातील प्राणी, झाडेझुडपे, वनऔषधी वनस्पती होरपळून नष्ट होतात. पक्ष्यांची अंडी, घरटी, पिल्ले जळून नष्ट होतात. वन्य प्राण्यासह जीवसृष्टीचा ऱ्हास होत असून तो टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Pune Delhi Plane Journey : दिल्लीला चला आता ‘बिझनेस क्लास’ने! पुण्यातून विमानसेवा सुरू; आरामदायक प्रवास; २५ हजारांपासून तिकीट

SCROLL FOR NEXT