Guardian Minister Gulabrao Patil while guiding the meeting regarding Warkari Bhawan.  esakal
जळगाव

Jalgaon News : वारकरी भवनाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन : पालकमंत्री पाटील

Jalgaon : प्रस्तावित ५५ एकरांवर जिल्हा वारकरी भवन जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रस्तावित ५५ एकरांवर जिल्हा वारकरी भवन जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरांच्या माध्यमातून संस्कारी पिढी घडविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल. खेडी शिवारात ६ कोटी ६ लाख निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता.४) सायंकाळी सहाला वारकरी भवनाचे भूमीपूजन होणार आहे. (Jalgaon Guardian Minister Patil statement Bhoomi Pujan of Varkari Bhavan by Chief Minister on Monday)

त्यानुषंगाने आज अजिंठा विश्रामगृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

बैठकीला ह.भ.प. परमेश्वर महाराज गोंडखेल, गोविंद महाराज केकत निंभोरा, रविंद्र महाराज हरणे, महंत संजीवदास महाराज सावखेडा, पांडुरंग महाराज आवारकर, सुधाकर महाराज (मेहूण), समाधान महाराज भोजेकर, अंकुश महाराज (मनवेल). (latest marathi news)

प्रतिभाताई जवखेडेकर, गजानन महाराज वरसाडे , सुशील महाराज (विटनेर), शाम महाराज (पिंपळगाव), यशवंत महाराज कमळगाव, कन्हैया महाराज, ह.भ.प. विजय महाराज भामरे, रुपचंद बाबा महाराज (दहिवदखुर्द), सदाशिव महाराज साकरीकर, दिनकर महाराज कडगावकर आदी किर्तनकारांसह दिंडीचालक, वारकरी संस्थाचालक, मठाधिपती उपस्थित होते.

ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा.सी. एस. पाटील यांनी केले. गजानन महाराज यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT