Guardian Minister Gulabrao Patil and others while distributing certificates at the Disability Health Checkup Camp.  esakal
जळगाव

Jalgaon News : राजकारण विरहित केलेल्या आरोग्य सेवेमुळे आत्मिक समाधान : पालकमंत्री पाटील

Jalgaon News : पाळधी येथे झालेल्या दिव्यांग, आरोग्य तपासणी शिबीरात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिव्यांग बांधवांसाठी व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी शासन सदैव तत्पर असून त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य व दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, राजकारण विरहित केलेली आरोग्यसेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होते. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Jalgaon Guardian Minister Patil marathi news)

पाळधी येथे झालेल्या दिव्यांग, आरोग्य तपासणी शिबीरात ते बोलत होते. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . संजय चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, संगोयो समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, सचिन पवार, डॉ. कमलाकर पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, मार्केट कमिटीचे प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

पाळधी येथे माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, मुकुंदराव गोसावी व जी.पी.एस मित्र परिवाराने आरोग्य व दिव्यांगासाठी राबविलेल्या उपक्रमांत आवश्यक साहित्याचे वाटप केले जाईल व मोतीबिंदू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत शस्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

शिबिरात ५३ दिव्यांग बांधवांना युडीआयडी प्रमाणपत्राचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिबिरात सुमारे ३०० दिव्यांग व्यक्तींची दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली असून १०० व्यक्तींची दिव्यांग साहित्यासाठी नोंदणी करण्यात आली.

शिबिरात २६९ जेष्ठ नागरीकांच्या केलेल्या तपासणीत १४३ व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन माजी सभापती नन्नवरे यांनी केले.आभार माजी जि. प. सदस्य पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT