Local crime branch team with suspects from Gujarat. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गुजरातचे किलर एलसीबीच्या ताब्यात; 16 लाखांत 2 हत्या करून पळताना अटक

Jalgaon Crime : अंजिठा चौकातून पुढील प्रवासाला निघण्याच्या तयारीत असलेले गुजरात राज्यातील दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अंजिठा चौकातून पुढील प्रवासाला निघण्याच्या तयारीत असलेले गुजरात राज्यातील दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुरत येथील एमआयएमचे पदाधिकारी खुर्शीद अली सय्यद यांच्याकडून १६ लाख रुपयांची सुपारी घेऊन आम्ही दोघांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. सूरज जिल्‍ह्यातील उमरपाडा येथे ८ जूनला बिलाल चांदी आणि अज्जू या दोघांची गळा चिरून हत्या झाली होती. (Gujarat killer arrested in custody of lcb after 2 murders)

संशयित अफजल अब्दुल शेख (वय ३८, रा. उमरपाडा मशिदीजवळ, सुरत), प्रज्ञेश दिलीप गामीत(वय २६, रा. तरकुवाँ डुंगरी फलिया, जि. वापी) दोन्ही फरारी झाले होते. २० दिवसांपासून सुरत पोलिस दोघांच्या मागावर होते. मात्र, ते मिळून येत नव्हते. गुजरात येथील दोन संशयित ऑटोनगरात आले असून, ते ट्रकमध्ये बसून फरारी होण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अक्रम शेख यांना मिळाली.

त्यांनी निरीक्षक बबन अव्हाड यांनी माहिती दिली. त्यावरून उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन साध्या वेशात अंजिठा चौकात पोचले. संशयित ट्रकच्या शोधात असताना, पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. अटक केल्यावर अफजल आणि प्रज्ञेश यांची गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली. त्यांनी खुनाची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT