आशिया कप २०२५ मध्ये भारताने युएईविरुद्ध पहिल्या सामन्यात २७ चेंडूत विजय मिळवला. ५८ धावांचे लक्ष्य भारताने ४.३ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केले. शिवम दुबे, कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचे महत्त्वाचे योगदाना राहिले..भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ स्पर्धेला दणक्यात सुरूवात केली आहे. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताने फक्त २७ चेंडूत विजय मिळवला. भारताचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध (UAE) झाला होता. या सामन्यात भारताने ९ विकेट्सने आणि ९३ चेंडू राखून विजय मिळवला.या सामन्यात युएईने भारताला ५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने केवळ ४.३ षटकात १ विकेट गमावत ६० धावा करून जिंकला. भारताच्या विजयात शिवम दुबे, कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचा मोलाचा वाटा राहिला..Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला.दरम्यान, भारतासाठी हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला टी२० विजय ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकटमध्ये सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत (आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये) भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यांनी श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांना मागे टाकले आहे. श्रीलंकेने २०१४ मध्ये चितगावला नेदरलँड्सविरुद्ध ९० चेंडू राखून, तर झिम्बाब्वेने मोझाम्बिकविरुद्ध नैरोबीविरुद्ध २०२४ मध्ये ९० चेंडू राखून विजय मिळवला होता. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंड आहे. त्यांनी ओमानविरुद्ध २०२४ मध्ये नॉर्थ साऊंडमध्ये १०१ चेंडू राखून विजय मिळवला होता..या सामन्यात भारताकडून ५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल उतरले होते. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत डावाची सुरुवात केली होती. त्याने आक्रमक फलंदाजी करताना भारताचा विजय सोपा केला. अभिषेकला चौथ्या षटकात जुनैद सिद्दकीने बाद केले. अभिषेकने २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा भारताला केवळ १० धावांचीच गरज होती. .यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्यानेही पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. नंतर पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शुभमन गिल ९ चेंडूत दोन २ चौकार आणि १ षटकारासह २० धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादव एका षटकारासह ७ धावांवर नाबाद राहिला..Asia Cup, IND vs UAE: सूर्यकुमार यादवने जिंकला टॉस; संजू सॅमसन-बुमराहला मिळाली संधी? पाहा प्लेइंग-११.तत्पुर्वी, युएईचा डाव १३.१ षटकात ५७ धावांवरच संपला होता. युएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. तसेच कर्णधार मुहम्मद वासीमने १९ धावा केल्या. पण या दोघांशिवाय कोणालाही ५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या..FAQs १. भारताने लक्ष्य किती चेंडूत पूर्ण केले?(How many balls did India take to chase the target?)➤ भारताने केवळ २७ चेंडूत लक्ष्य गाठलं.२. या सामन्यात भारताने किती विकेट्सने विजय मिळवला?(By how many wickets did India win the match?)➤ भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला.३. भारताकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?(Who scored the most runs for India?)➤ अभिषेक शर्माने सर्वाधिक ३० धावा केल्या.४. युएईच्या डावात सर्वाधिक धावा कोणी केल्या?(Who was UAE’s top scorer?)➤ अलिशान शराफूने २२ धावा केल्या.५. भारतीय गोलंदाजांपैकी कोण सर्वात यशस्वी ठरले?(Which Indian bowlers were the most successful?)➤ कुलदीप यादव (४ विकेट्स) आणि शिवम दुबे (३ विकेट्स).६. भारताने किती चेंडू राखून विक्रमी विजय मिळवला?(How many balls did India spare in their record win?)➤ भारताने ९३ चेंडू राखून विक्रमी विजय मिळवला.७. हा सामना कुठे खेळला गेला?(Where was the match played?)➤ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.