Anagha Dohole while making halwa ornaments. esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावचे हलव्याचे दागिने पोचले आयर्लंडला! कलाकृतीत तिसरी पिढीही अग्रेसर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विदेशात राहूनही आपल्या संस्कृती व परंपरा संवर्धनाचे कार्य अविरत सुरू ठेवणारे अनेक कुटुंबीय आहेत. अशाच आयर्लंडमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या मुलुंड येथील रहिवासी आईने हलव्याचे दागिने पाठविले आहेत. विशेष म्हणजे, जळगावातील अनघा डोहोळेंनी हे दागिने तयार केलेत.

जळगाव येथील डोहोळे परिवारात गेल्या ७० वर्षांपासून (कै.) उमा उपेंद्र डोहोळे यांच्यापासून त्यांची नातसून अनघा अजय डोहोळे या तिसऱ्या पिढीपर्यंत हाताने हलव्याचे दागिने तयार करण्याची परंपरा कायम आहे. (Jalgaon Halwa jewelery reached Ireland third generation leader in art Jalgaon News)

आयर्लंडला पोचले दागिने

यंदा मुलुंड येथील सुनीता सतीश बिडवई यांनी आयर्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या नवविवाहित मुलगी आदिती अंकुर त्रिपाठी हिच्या संक्रांती सणासाठी अनघा डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे दागिने घेऊन तिकडे पाठविले आहेत.

सुनीता बिडवई यांचे आजोळ जळगावचे असल्यामुळे उमा डोहोळे या स्वतः हाताने ५० किलोपर्यंतचा हलवा बनवून महिला सहकारी मंडळास विकत देत असतं आणि त्यांची मुलगी (कै.) शालिनी पानट व नात मीनाक्षी कुलकर्णी या दोघी हलव्याचे दागिने तयार करीत असतं, याची त्यांना माहिती होती. सोशल मीडियातून डोहोळे परिवाराची तिसरी पिढी ही परंपरा पुढे चालवीत असल्याची त्यांना माहिती मिळाली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

दागिन्यांचे गेले कुरिअर

बिडवई यांनी अनघा यांच्याशी संपर्क साधून विदेशात असलेल्या आपल्या मुलीसाठी मंगळसूत्र, राणीहार, तनमणी, बांगड्या, तोडे, ठुशी, कंबरपट्टा, बाजूबंध, नथ, झुबे, बिंदी आणि जावईंसाठी हलव्याचे दागिने मागणीप्रमाणे तयार करून घेतले व ते आयर्लंडला पाठविले.

"कलेची आवड असल्याने सासरी हलव्याचे दागिने तयार करण्याचे मी स्वतः शिकून घेतले. आज मी तयार केलेले हलव्याचे दागिने विदेशात गेल्यामुळे माझ्या आजेसासूंपासूनचा परिश्रमाचा वारसा समृद्ध झाला आहे." -अनघा डोहोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT