आरोग्य विभाग sakal
जळगाव

आरोग्य विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये

कोरोना रुग्णवाढीचा परिणाम; ऑक्सिजन, बेड होताहेत सज्ज

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - कोरोना महामारीचे रुग्ण देशात वाढत आहेत. परदेशातून आलेले नागरिक कोरोनाबाधीत होताना दिसताहेत. यामुळे चौथी लाट येते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. जर जळगाव जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपायासाठी आरोग्य यंत्रणेला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये आला आहे.

कोरोनाची तिसरी लाट आली, मात्र बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्याने त्यांना बाधा झाली नाही. ज्यांना बाधा झाला त्यांना ऑक्सिजनची गरज भासली नव्हती. अनेकांना वरच्यावर औषधांनी बरे वाटले. कोरोना लसीच्या परिणामामुळे जळगाव जिल्ह्यात तिसरी लाट आटोक्यात होती. आता जूनमध्ये चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोविडचे सर्व निर्बंध मुक्त करण्यात आले असल्याने सर्वत्र गर्दी होत आहे. मास्क वापरला जात नाही. तशातच कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत वाढत आहे. विशेषतः परदेशातून आलेले नागरिक त्यात अधिक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सतर्कच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सूरू आहे किंवा नाही याची तपासणी सुरू आहे. अनेक ठिकाणी बेडचे नियोजनही केले जात आहे. कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी औषधी, इंजेक्शन, ऑक्सिजन आदींबाबत तयारी सुरू आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत रुग्ण आढळलेले नाहीत. आम्ही ऑक्सिजन, बेड, औषधींची व्यवस्था केली आहे. इतर ठिकाणी कोरोनाची परिस्थिती पाहून लक्ष ठेवून आहोत.

- डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT