Minister Anil Patil and others present on the occasion of providing assistance to Sheikh Shahid's family esakal
जळगाव

Jalgaon News : मृत शेखच्या कुटुंबाला 51 हजारांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न

Jalgaon News : शाहीदच्या पीडित कुटुंबीयांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांत्वन करून ५१ हजारांची मदत रोख स्वरूपात दिली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : आर. के. नगरमध्ये इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना, तोल जाऊन खाली पडल्याने मिलचाळ भागातील २४ वर्षीय शेख शाहीद शेख सादीक याचा मृत्यू झाला होता. शाहीदच्या पीडित कुटुंबीयांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांत्वन करून ५१ हजारांची मदत रोख स्वरूपात दिली. (Jalgaon Help of 51 thousand to family of deceased Sheikh)

शाहीदचे कुटुंबीय त्याच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शेख कुटुंबातील होतकरू आणि कमावता मुलगा जाऊन कुटुंबावर मोठा आघात झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.

काहीतरी आधार म्हणून मृत तरुणाच्या कौटुंबिक सदस्यांकडे मंत्री अनिल पाटील यांनी ५१ हजारांची मदत सुपूर्द केली. माजी नगरसेवक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, विनोद कदम, जितेंद्र हगविणे, विक्की पानसे, अलीम मुजावर, आबीद शेख व छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे सदस्य उपस्थित होते. या योगदानाबद्दल मिलचाळ भागातील छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेतर्फे मंत्री पाटील यांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

SCROLL FOR NEXT