The ancient pond at Gram Panchayat Chowk, which is counting its last elements. esakal
जळगाव

Jalgaon News : लासूरचा ऐतिहासिक तलाव मोजतोय अखेरची घटका; झाडेझुडपे वाढल्याने झाली कचराकुंडी

Jalgaon : लासूर (ता. चोपडा) येथील बाजार चौकातील जुना व ऐतिहासिक तलाव शेवटची घटका मोजत असून, त्यात झाडे-झुडपे वाढून त्याची कचराकुंडी होत असल्याचे दिसून आले आहे.

ॲड. बाळकृष्ण पाटील

Jalgaon News : लासूर (ता. चोपडा) येथील बाजार चौकातील जुना व ऐतिहासिक तलाव शेवटची घटका मोजत असून, त्यात झाडे-झुडपे वाढून त्याची कचराकुंडी होत असल्याचे दिसून आले आहे. लासूरच्या मुख्य बाजार चौकात खूप जुना तलाव असून, त्या शेजारीच एक जुनी मशीद आहे. कधीकाळी या तलावातून बाजार चौकात असलेल्या अनेक हॉटेलमध्ये पाणी नेऊन वापरण्यात येत असे. खूप खोलवर असे पाणी त्यावेळी या तलावात होते. ( historic lake of Laser is destroy due to Garbage dump)

आता वयाची पन्नाशी व साठीत असलेल्या असंख्य लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाण्याने पूर्ण भरलेला तलाव पाहिलेला आहे. मात्र काळाच्या ओघात या तलावात पाणी येणे थांबले. तलावाच्या चारही भिंतींकडून कचरा टाकण्यास सुरू झाली. तलावात झाडे झुडपे वाढली. बाजारपट्टयाकडील दगडी बाजू आणि चौथरा आजही भक्कम असला तरी तीन बाजूंकडील भाग मात्र पूर्ण कोसळत असून, जुनी मशीद वाचावी म्हणून त्या भागात खालून वरपर्यंत भिंत बांधली गेल्यामुळे तेवढाच भाग सुरक्षित असल्याचे दिसून येते.

लासूर येथील पुरातन काळातील ठोक्यांचा वाडा याच ठिकाणी होता. तो आता जमीनदोस्त होऊन ती जागा आता विक्रीने दुसऱ्याकडे गेली आहे. याच ठोक्यांच्या वाड्यात पेशव्यांच्या गारद्याला आश्रय दिल्याचे जुन्या नोंदीत आढळून येते. त्या काळात या तलावाचा वापर होत असल्याचा उल्लेख आणि अनुभव जुने जाणकार आजही सांगतात. चौकाकडील मोठ्या दगडी चिऱ्यांचा बांधीव भाग आणि तलावात प्रवेश करताना सुमारे वीस फूट बाय वीस फुटाचा चौथरा आजही चांगल्या स्थितीत आहे. (latest marathi news)

मात्र तलावाच्या तीन बाजूच्या भिंती वजा बांधकाम ढासळले असून, खाली येत आहे. कधी काळी लासूरची आणि यात चौकाची रोनक असलेला हा तलाव आज भकास दिसू लागला आहे. साधारणपणे दोनशे फूट लांबी व दोनशे फूट रुंदीचा हा तलाव सुमारे ६० ते ७० फूट खोल असेल. सद्यस्थितीत त्यात काटेरी बाभूळ आणि अन्य झुडपे वाढली असून, गेल्या अनेक वर्षात त्यात पाणी येणेच थांबले आहे. येणारा आजूबाजूचा सर्व कचरा, बिनकामाच्या वस्तू त्यात टाकल्या जात असून, त्याला आता कचराकुंडीचे स्वरूप येत आहे.

कधी काळी गावाचे वैभव असलेल्या या पुरातन तलावाला पुरातत्त्व विभागाने ताब्यात घेतल्यास ग्रामपंचायतीमार्फत त्याचे नियोजन झाल्यास आजही त्याचे पुनरज्जीवन होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी अशा प्रकारचे तलाव दिसून येतात. त्यापैकी एक असलेला लासूरचा हा तलाव गेली अनेक वर्षे या गावाला संदर्भ देत राहिला असला तरी सद्यस्थितीत शेवटची घटका मोजतोय हे मात्र खरे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT