A young theater artist from Thane thanked
A young theater artist from Thane thanked esakal
जळगाव

Jalgaon News : ठाण्याच्या नाट्यकलावंत तरुणीने मानले आभार; रिक्षाचालकामुळे महागडा मोबाईल मिळाला परत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रिक्षातून प्रवासात हरविलेला महागडा मोबाईल शोधून-शोधून हैराण झाली असताना नाट्यकलावंत तरुणीला रिक्षाचालकाने तो मोबाईल परत आणून देत सुखद धक्का दिला. प्रवासादरम्यान हरविलेला मोबाईल प्रामाणिक रिक्षाचालकाने त्या तरुणीला शोधून सुखरूप परत केल्याने ठाण्याच्या नाट्यकलावंत तरुणीने रिक्षाचालकासह जळगावकरांचे आभार व्यक्त करत आपली वाट धरली.

डोंबिवली (जि. ठाणे) येथील नाट्य कलावंत सायली पावसकर सोमवारी (ता.२६) जळगावला आल्या होत्या. (jalgaon honest puller returns an expensive mobile phone lost while traveling in rickshaw)

आगामी नाट्यप्रयोगासाठी त्यांनी जळगाव शहरात काही ठिकाणी कामानिमित्त भेटी दिल्यानंतर त्या रिंग रोड, पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी चौक अशा रिक्षाने एकीकडून दुसरीकडे फिरत असताना अनावधानाने त्यांच्या खिश्यातील महागडा मोबाईल कुठेतरी पडला. तो शोधूनही सापडेना.

फोन लावला तर मोबाईल कधी सायलेंट, तर कधी नॉट-रिचेबल येत होता. अशा परिस्थितीत सायली यांनी ज्या रिक्षाथांब्यावरून प्रवासाला सुरवात केली, तेथे जाऊन चौकशी केली. तेथे मुस्तकीम अली (रा. पिंप्राळा) हा रिक्षाचालक भेटला.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या सोबत पिंप्राळा-हुडको मार्गावर धावरणाऱ्या रिक्षाचालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. आठ ते दहा रिक्षाचालकांना फोन केल्यानंतर थोड्या वेळाने हा मोबाईल मोहसीन याच्या रिक्षात असल्याचे त्याने फोन करून सांगितले. (latest marathi news)

वेळीच मोहसीन याला मागील सीटवर राहिलेला मोबाईल मिळाला. हरविलेला मोबाईल घेऊन मोहसीन व मुस्तकीम यांनी सायली पावसकर यांना शोधून तो त्यांच्याकडे सुपूर्द केला.

सेल्फी विथ थॅक्स्‌

हरविलेल्या मोबाईलमध्ये पेटीएम-अकाउंट, ई-मेल, फोटो, व्हिडीओ आणि बरेच काही महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने मोबाईल हरविल्याने सायली यांना विनाकारण नसत्या त्रासाला समोरे जावे लागले असते. त्यात मोबाईल हरविल्याने झालेले नुकसान वेगळे.

इतके सर्व विचार डोक्यात सुरू असताना तास-दोन तासांत हरविलेला मोबाईल रिक्षाचालकांनी प्रयत्नपूर्वक सुखरूप मिळवून दिल्याने या रिक्षाचालकासोबत सेल्फी घेऊन सायलीने ‘थॅक्स विथ सेल्फी’ घेत जळगावकराचा प्रामाणिकपणा आणि मदतीच्या भावनेचे कौतुक करत परतीची वाट धरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT