politicians  esakal
जळगाव

Jalgaon News: गावकारभाऱ्यांचा सरकार दरबारी वाढला मान! भुसावळ तालुक्यात 39 सरपंच, उपसरपंचांना दुप्पट मानधनाचा मिळणार लाभ

Latest Jalgaon News : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद केल्याने आता ते साहेब झाल्याची भावना आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : राज्य सरकारने सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट केले आहे. या निर्णयाचा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींमधील पदाधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे एकच पद केल्याने आता ते साहेब झाल्याची भावना आहे. (Bhusawal taluka 39 officials will get benefit of double remuneration)

राज्य सरकारने सरपंच, उपसरपंच मानधनवाढीचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायत वर्तुळात आनंदाचे वातावरण होते. अनेक वर्षांपासून सरपंच परिषद व ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्या होत्या. त्यातील काही मागण्यांची पूर्तता झाल्याचा आनंद असल्याची भावना ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम तर सरपंच परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.

ग्रामसेवक संघटनेचे संजीव निकम यांनी सांगितले, की या निर्णयामुळे ग्रामसेवकांची पदोन्नती होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींमध्ये ३९ सरपंच व उपसरपंच आहेत. त्यांना आता मानधनाची रक्कम दुप्पट होणार आहे.

दोन हजार लोकसंख्येपर्यंतच्या सरपंचाला सध्या ३ हजार रुपये मानधन मिळते, तर उपसरपंचास एक हजाराची रक्कम दिली जाते. आठ हजार लोकसंख्येच्या गावाचा कारभार पाहणाऱ्यास अनुकूल चार हजार व दीड हजार, तर आठ हजारावरील ग्रामपंचायतीच्या सरपंचास पाच हजार व दोन हजार रुपये मिळतात.

पाठपुराव्याला यश

गावांच्या विकासकामांमध्ये सरपंच यांचा सिंहाचा वाटा समजला जातो. संसर्गजन्य कोरोना काळात देखील सरपंचांनी ग्रामस्थांच्या सुविधांसाठी गावपातळीवर काम केले आहे. परंतु गावाचे प्रथम कारभारी सरपंच यांना त्यांच्या कार्याप्रमाणे योग्य ते मानधन मिळू शकले नाही. परंतु भाजप महायुतीच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे सरपंच परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी मानधन वाढीसंदर्भात मागणी केली. (latest marathi news)

आमदार सावकारेंसह जिल्ह्यातील सर्व सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताजी काकडे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांना घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सरपंच यांचा मनधन वाढीचा प्रलंबित मागणीचा विषय केला. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखवून हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे या विषयाला मंत्रिमंडळाने मंगळवारी(ता. २४) मंजुरी दिली.

सध्याचे व वाढीव मानधन असे

गावाची दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असेल, तर सरपंचाला ३ हजार रुपये आणि उपसरपंचाला एक हजार, आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असल्यास सरपंचाला चार हजार व उपसरपंचाला दीड हजार, आठ हजारांवरील लोकसंख्या असल्यास सरपंचाला पाच हजार, तर उपसरपंचाला दोन हजार रुपये दिले जातात.

तर नवीन मंजूर मानधन दोन हजार लोकसंख्येच्या सरपंचास सहा हजार, उपसरपंचास दोन हजार, दोन हजार लोकसंख्येपुढे आठ हजारापर्यंत लोकसंख्येसाठी आठ हजार व तीन हजार, आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात १० हजार व चार हजार अशी वाढ करण्यात आली आहे.

"शासनाने आमच्या अपेक्षेपेक्षा कमी मानधन वाढ केली आहे. मात्र, तरी देखील सरपंच व उपसरपंचांनी समाधान मानून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. तसेच येणाऱ्या काही दिवसांत जळगाव, भुसावळ येथे सरपंच भवनाची निर्मितीचे होणार आहे."

- प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, सरपंच परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT