Household items burnt in the fire  esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : नांदखुर्दे येथे दुकानासह घराला भीषण आग; किराणा, अन्नधान्य, पैसे, दागिने जळून खाक

Fire Accident : नेहमीप्रमाणे रात्री दुकानाचे व्यवहार आटपून जेवण वगैरे करून कुटुंब गुरुवारी रात्री झोपले असता साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घरात काहीतरी जळत असल्याचा वास येऊ लागला.

सकाळ वृत्तसेवा

कासोदा (ता. एरंडोल) : येथून जवळ असलेल्या नांदखुर्दे खुर्द येथील अरुण सुभाष पाटील यांच्या किराणा दुकानासह घराला ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागून दुकानातील सर्व किराणा माल, घरातील सर्व वापरातील वस्तू, अन्नधान्य, उपकरणे आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १८) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घडली. (house shop caught fire at Nandkhurde)

नेहमीप्रमाणे रात्री दुकानाचे व्यवहार आटपून जेवण वगैरे करून कुटुंब गुरुवारी रात्री झोपले असता साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घरात काहीतरी जळत असल्याचा वास येऊ लागला. अरुण पाटील हे झोपेतून उठले तेव्हा वायर जळत असून, वास येत होता व फ्रिजजवळ मोठा आवाज झाला. आग भडकली.

आवाजाने कुटुंब जागे झाले आणि आग संपूर्ण घरात व दुकानात पसरली. कुटुंब दुकानाच्या पुढच्या दरवाजातून बाहेर पडले व तेव्हाच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घराला अवघ्या पाच ते दहा मिनिटात आग झपाट्याने वाढली.

घर गावातील मंदिर चौकात असल्याने सर्वसामान्य गावकऱ्यांनी घराकडे धाव घेतली. परंतु आग इतकी भीषण होती की सर्व गावकरी, घरमालक काहीही करू शकले नाही. आपल्या डोळ्यासमोर सारा संसार दुकान जळून खाक होताना हतबल होऊन पाहत होते. (latest marathi news)

नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिस गाडी गस्तीवर असल्यामुळे तत्काळ हजर झाली व अग्निशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन तासांत संपूर्ण दुकान घर जळून खाक झाले. डोळ्यासमोर होत्याचे नव्हते झाले. या आगीत अन्नधान्य, पैसे, दागिने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. फक्त अंगावरच्या कपड्यासह कुटुंब वाचले.

...जीवित हानी टळली

अरुण पाटील यांची मुलगी आजच सायंकाळी सातला माहेरी आली होती. सुदैवाने मुलगी व तिचे तीन महिन्याचे लहान बाळही बचावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पती-पत्नी, मुलगी, तिचे बाळ सुखरूप असून, कोणतीही जीवित हानी झाली नाही. विशेष म्हणजे, आगीत सर्व जळून गेल्यावरही देव्हारा व त्यातील देव, नारळ सुरक्षित असून, आगीपासून वाचले आहेत. हे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, तलाठ्यांकडून घटनेचा पचनामा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT