Accident News sakal
जळगाव

Jalgaon News : अपघातग्रस्त कारमधील तिसरा कोण? डीवायएसपी, एसपीसमक्ष जखमींची विचारपूस

Jalgaon : जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडीजवळील वळणावर सुसाट स्पोर्ट्‌स कारचालकाचे नियंत्रण सुटून आशासेविकेसह तीन निष्पाप बालकांचा करुण अंत झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडीजवळील वळणावर सुसाट स्पोर्ट्‌स कारचालकाचे नियंत्रण सुटून आशासेविकेसह तीन निष्पाप बालकांचा करुण अंत झाला. अपघातग्रस्त वाहनात गांजा सापडला. मात्र, त्याचा कुठेही उल्लेख नाही. चालकाला त्याच्या मित्रासह जमावाच्या तावडीतून पोलिसांनी वाचवले, तर कारमधील तिसरा जमावाला पाहताच पळून गेला. रामदेववाडीजवळील पठारवाडी परिसरातील आशासेविका राणी ऊर्फ वच्छलाबाई सरदार चव्हाण मंगळवारी (ता. ७) लहान मुलांना घेऊन स्कूटीवरून शिरसोलीकडे येत होत्या. ( Inquiring of injured before DYSP and SP for accident )

जळगावकडून सुसाट इको स्पोर्ट्‌स कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतची सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला. सोबत असलेला लक्ष्मण नाईक (वय १६) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अभिषेक कौल कार चालवीत होता, तर त्याच्यासोबत अखिलेश पवार व धुव्र होते.

पोलिसांनी जमावाच्या तावडीतून अभिषेक व अखिलेश याला वाचविले. अखिलेशनेच डीवायएसपी गावित यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कार असल्याची माहिती दिली होती. मात्र, दोघा जखमींव्यतिरिक्त गाडीतील तरुणाचा आणि मिळालेल्या गांजाच्या पुडीचा उल्लेख टाळला आहे. (latest marathi news)

राजकीय गोतावळा अन्‌ ग्रामस्थ

सायंकाळी पावणेपाचला अपघात होऊनही रात्री नऊपर्यंत पोलिस आणि ग्रामस्थांचा संघर्ष सुरू होता. आरसीपीच्या एका पोलिसाला ग्रामस्थांनी मारहाणही केली. कारमधील तरुणांचा जीव पोलिसांमुळेच वाचला. या तरुणांच्या बाजूने अनेक पुढारी पोलिस ठाण्यात पोचले होते. घडलेला अपघात हिट ॲण्ड रन प्रकारातील असल्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.

''अपघातग्रस्त वाहनात गांजाच्या दोन पुड्या आढळल्या आहेत. कार रेसिंग बाबत अद्याप आमच्यापर्यंत माहिती आली नाही. कारमधील एकाला गंभीर दुखापत झाली असून, जमखींना मुंबईला हलविले आहे.''-बबन आव्‍हाड, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

SCROLL FOR NEXT