Inspection of city roads by Collector esakal
जळगाव

Jalgaon News : शहरातील रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी; रस्त्यांच्या गुणवत्तेचे यांत्रिक परीक्षण

Jalgaon : जिल्हा नियोजन समिती निधीतून शहरात झालेल्या रस्त्यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी करीत, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून गुणवत्ता तपासणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा नियोजन समिती निधीतून शहरात झालेल्या रस्त्यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी करीत, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून गुणवत्ता तपासणी केली. रस्ते झालेल्या गल्लीतील लोकांशी संवाद साधला. महापलिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, महानगर पालिकेचे अभियंत्यासह कर्मचारी उपस्थित होते. (jalgaon Inspection of city roads by Collectors)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी दरम्यान, एका भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला विचारले. त्यावेळी तो म्हणाला ' मी इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो, पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो.

आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते ' असा अभिप्राय त्यांनी दिला. एका निवृत्त नागरिकाने, पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली पार घरात धुरळा यायचा आता नवीन रस्ता झाल्या पासून धुळ नाही त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे अशी प्रतिक्रिया दिली. (latest marathi news)

एक ठिकाणी नालीच्या कडेची जागा सुटलेली असल्याने तिथे महापालिकेला पेव्हरब्लॉक लावायला सूचना दिल्या. रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढऱ्या पट्या मारण्याच्या सूचना दिल्या.

गुणवत्तेची तपासणी

जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याची मजबुती यंत्राद्वारे मोजून त्यावर समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तें चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT