Hirakni room which is closed in the bus station premises. esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ बसस्थानकातील हिरकणी कक्षाला टाळे; परिवहन विभागाचा बेजबाबदारपणा

Jalgaon : नेहमीच या कक्षाला कुलूप लावलेले असते, अशी भावना प्रवासी स्तनदा मातांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील बसस्थानकामधील हिरकणी कक्ष फक्त नावालाच उभारण्यात आले असल्याचे दिसत असून, नेहमीच या कक्षाला कुलूप लावलेले असते, अशी भावना प्रवासी स्तनदा मातांकडून व्यक्त होत आहे. परिवहन महामंडळाने प्रवासी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाचे धोरण राबवले. मात्र स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या धोरणावर पाणी फिरविल्याचे चित्र समोर येत आहे. मातांची होणारी कुचंबणा लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील विविध बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केले. (irresponsibility of Transport Department of lock of Hirkani Room at Bhusawal Bus Stand )

त्याच वेळी भुसावळ बसस्थानकात देखील हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र हा कक्ष कुलूप बंद असल्याने महामंडळाच्या मुख्य उद्देशालाच स्थानिक जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे समोर आले आहे. यातून लेकुरवाळ्या मातांची आपल्या बाळाला स्तनपान करताना कुचंबणा होत आहे. राज्यातील महायुतीच्या शिंदे सरकारने महिलांना पन्नास टक्के बसभाड्यात सवलत दिली असल्याने ९५ टक्के महिला वर्ग एसटी बसने प्रवास करीत आहे.

त्या दृष्टीने लेकुरवाळ्या महिला आपल्या तान्हुल्या बाळांना घेऊन प्रवास करीत आहे. बसस्थानकावरील गोंधळ, गर्दी लाऊडस्पीकर, विविध वाहनांच्या हॉर्न कर्कश आवाज यामुळे लहान बाळांची चिडचिड होते. त्यामुळे बाळ रडू लागल्यास मातांना आपल्या बाळांना स्तनपान द्यावे लागते. मात्र हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याने उघड्यावर स्तनपान करावे लागत आहे. परिणामी, त्यांची कुचंबणा होत आहे. (latest marathi news)

मात्र नेमका हाच विषय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकावर मातांना सुरक्षित स्तनपान करता यावे, यासाठी विविध बसस्थानकांसह भुसावळ येथील बसस्थानकात नियंत्रण कक्षाशेजारी हिरकणी कक्ष सुरू केला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे हिरकणी कक्ष बंद अवस्थेत आहे.

मूळ उद्देशालाच हरताळ...

राज्य परिवहन महामंडळाने येथील बसस्थानकांत हिरकणी कक्ष सुरू केला आहे. मात्र, अनेक महिलांना हा कक्ष कुठे आहे व कोणासाठी आहे, याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांना या कक्षाबाबत माहिती आहे. मात्र कक्ष कुलूपबंद असल्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे विचारणा करीत नसल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाने भुसावळ बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरू केला आहे. सुरवातीला या कक्षामुळे अनेक स्तनदा मातांना दिलासा मिळाला. मात्र या कक्षाकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने कक्ष कुलूप बंदच दिसत आहे.

''भुसावळ बसस्थानकात नियंत्रण कक्षाशेजारी हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाची चावी नियंत्रण कक्षात ठेवण्यात आली आहे. स्तनदा माता प्रवाशांनी चावी मागितल्यानंतर तो उघडून दिला जात जातो.''- राकेश शिवदे, एसटी आगार व्यवस्थापक, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census: जनगणनेत जात सांगणं अनिवार्य नाही! देशात पहिल्यांदाच डिजिटल सेन्सस; ११ हजार ७१८ कोटी मंजूर

TAIT Exam 2025: भावी शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी! TAIT परीक्षेतील २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Pregnancy Prep 2026: पुढच्या वर्षी प्रेग्नेंसी प्लॅन करताय? मग 2025 संपण्याआधीच बदला 'या' ५ महत्त्वाच्या सवयी

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

SCROLL FOR NEXT