रोही प्राण्यास दिले जीवदान sakal
जळगाव

जामनेर : पुरात वाहणाऱ्या रोही प्राण्यास दिले जीवदान !

मांडवे बुद्रकच्या तरुणांची भूतदया

शंकर भामेरे

पहूर, ता.जामनेर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील खडकी नदीला आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या रोही प्राण्याला मांडवे बुद्रुक येथील तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जिवदान देत भुतदयेचा आदर्श वस्तुपाठच निर्माण केला . हि घटना आज मंगळवारी ( ता . २८ )दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे . त्यामुळे सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथून वाहणाऱ्या खडकी नदीत रोही प्राणी वाहत असल्याचे पूर पहाव्यास आलेल्या मुलांना दिसले. गावातीलच मजीत अब्‍बास तडवी या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहणाऱ्या रोहिस किनाऱ्याला लावले. सुमारे दोन किलोमीटर नदी अंतर सदर रोही वाहत आला.

त्याच्या पायाला त्यामुळे दुखापत झाली. मांडवे बुद्रुक गावचे पोलिस पाटील सागर गोपीचंद जाधव, अजित तडवी, आशिक तडवी, गणेश जाधव ,सलीम तडवी, आरिफ तडवी, प्रकाश जाधव, आबा तडवी,अमर तडवी, जावेद तडवी,भूषण तडवी, युवराज जाधव, हसन तडवी, राजू इंगळे, संजय जाधव, दिपक जाधव, या तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुक्या जीवास जीवदान दिले .

पोलीस पाटील सागर जाधव यांनी तत्काळ वन विभागाचे महाजन यांना फोन द्वारे माहिती दिली. पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हवालदार देशमुख यांना माहिती मिळताच देशमुख आणि महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुरात वाहून आलेल्या रोहीवर (मादी) प्रथमोपचार करून जामनेर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून वन्यजीवास जीवनदान दिल्याबद्दल मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांचे कौतुक होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT