lina patil esakal
जळगाव

Jalgaon News : संस्कारांचं पावित्र्य, शाही सोहळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : लिना पाटील

Jalgaon : मुला-मुलींची लग्न, मौंज अथवा कुटुंबातील इतर एकत्रीकरणाचे सोहळे आता इव्हेंट म्हणून साजरे होतात.. परंतु, हे सोहळे म्हणजे आपल्या आयुष्यातील सोळा संस्कारांमधील संस्कार असतात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुला-मुलींची लग्न, मौंज अथवा कुटुंबातील इतर एकत्रीकरणाचे सोहळे आता इव्हेंट म्हणून साजरे होतात.. परंतु, हे सोहळे म्हणजे आपल्या आयुष्यातील सोळा संस्कारांमधील संस्कार असतात. त्याचे पावित्र्य राखले जावे आणि त्यानिमित्ताने चांगला इव्हेंट साजरा करण्याच्या ग्राहकांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न म्हणून ‘वीणूज् वर्ल्ड’ची मुहूर्तमेढ रोवली, अशी भावना या फर्मच्या संचालिका लिना पाटील यांनी व्यक्त केली. (jalgaon lina Patil statement of Purity of rites an attempt to fulfill dream of royal ceremonies marathi news)

एमआयडीसीत दीड एकराच्या विस्तीर्ण जागेत लग्नसोहळ्यांसाठी देखणे आणि सर्वसुविधांयुक्त सभागृह (बँक्वेटहॉल) साकारताना लिना पाटील यांनी ग्राहकांची गरज, त्यांची मागणी लक्षात घेऊन त्यात कुठेही कमतरता येणार नाही, यादृष्टीने स्वत:च्याही संकल्पनांना आकार दिला. या बँक्वेट हॉलच्या निर्मितीला मंगळवारी (ता.१२) वर्ष पूर्ण होतेय, त्यानिमित्त त्यांनी ‘सकाळ’शी दिलखुलास संवाद साधत वर्षात त्यासंबंधी आलेले अनुभव त्यांनी ‘शेअर’ केलेत.

अशी सूचली संकल्पना

श्रीमती पाटील म्हणाल्या, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सहजच एके दिवशी पती विनय यांच्यासोबत आमच्या मालकीचे प्लॉट पाहण्यासाठी निघालो.. एमआयडीसीत भुसावळ रोडवर महामार्गापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर आमची दीड एकर जागा होती.. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अगदी पुढे.

मुला- मुलींचे लग्न सोहळे चांगल्या ठिकाणी साजरे करण्याच्या मातापित्यांच्या स्वप्नपूर्तीला आकार द्यायचा, अन्य कौटुंबिक सोहळ्यांसाठी सर्वसुविधायुक्त सभागृह असावे, या उद्देशातून या चांगल्या लोकेशनच्या जागेवर बँक्वेट हॉल बांधण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी विनय यांना तयार केले, आणि वेगवेगळ्या कल्पना घेऊन हॉलच्या निर्मितीचे कार्य सुरु झाले.

सर्व गरजांच्या पूर्ततेचा प्रयत्न

या हॉलची निर्मिती करताना नाशिक, पुण्यातील काही सभागृह मी पाहिले. त्यात कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले आहे, आपल्याकडील ग्राहकांची गरज काय आहे, या भागातील हवामान, उन्हाळ्यातील तापमान, त्यानुसार एसी युनिटची आवश्‍यकता, प्रशस्त रुम व विस्तीर्ण पार्किंग, हॉलची भव्यता या बाबी ग्राहक विचारात घेतात. हे सोहळे देखणेपणाने साजरे करण्यावर आपला भर असतो. त्यासाठी बँक्वेट हॉल म्हणून त्यात लागणाऱ्या सर्व गोष्टी, गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही ‘वीणूज्‌ वर्ल्ड’मध्ये केलांय, असे लिना पाटील सांगतात.

संस्काराचे पावित्र्य अन्सा माजिक जाणीवही

लग्न सोहळे, कौटुंबिक समारंभ हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य अंग. जवळच्या नातलगाची असो की, दूरवरच्या मित्राची; पत्रिका आली की आपण नटून थटून हे सोहळे अटेंड करतो. शिवाय, हिंदूंच्या जीवनात तर अशा सोहळ्यांना संस्कारच मानले जाते. या संस्कारांचे पावित्र्य अशा प्रकारच्या सर्वच सोहळ्यांमध्ये राखले जावे, म्हणून आम्ही प्रबोधनही करतो.

उष्ट अन्न टाकू नये, पोटाला लागेल तेवढेच ताटात घ्यावे, यादृष्टीने सर्वांनीच जबाबदारीने वागले पाहिजे, यावरही भर असतो. सोहळ्यांचे हे हॉल, तेथील मालमत्ता आपली समजून नागरिकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, याबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचे मतही श्रीमती पाटील यांनी व्यक्त करतात. (latest marathi news)

क्षेत्र अधिक व्यापक होतेय

कौटुंबिक सोहळे, लग्न समारंभांना इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झालेय. त्यात दररोज बदल घडत आहेत. या क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यामुळे नेहमीच अपडेट राहून अपग्रेड व्हावे लागतेय. ग्राहकांच्या गरजा व मागण्याही बदलत आहेत. हे क्षेत्र अधिक व्यापक होतेय, म्हणून त्यात आवश्‍यक बदल करण्याचे आव्हानही आमच्यासमोर आहे.

‘डेस्टीनेशन वेडिंग’ची संकल्पना

अलिकडच्या काळात आता उच्चभ्रू लोकांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची संकल्पना आली असून त्याचा ट्रेंड वाढतोय. महाबळेश्‍वर, लोणावळा, खंडाळा यासारख्या हिल स्टेशनला लग्न सोहळे साजरे होताय. पण, सर्वांनाच ते परवडणारे नाही. म्हणून काही ग्राहक आपल्याच शहरात, शहरालगत मर्यादित स्वरुपात अशा नियोजनाची गरज शोधतात.

त्यासाठी लवकरच आम्ही भव्य लॉन, त्याला लागून हॉल आणि सोबत प्रशस्त व सर्व सुविधांनी युक्त २०-२२ रुम्स अशा सर्व लक्झरियस गरजा पूर्ण करणारा प्रोजेक्ट काही दिवसांत साकारतोय, असेही लिना पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT