seed esakal
जळगाव

Jalgaon Crop Seed : खतांपाठोपाठ बियाण्यांचेही लिंकींग! शेतकऱ्यांची आर्थिक लूट; कृषी विभागाकडून दुकानांची तपासणी

Jalgaon News : शेतकऱ्यांकडून जादा मागणी असलेल्या कापूस बियाण्यांच्या पाकिटामागे ३०० ते ४०० रुपये ज्यादा घेतले जात आहेत

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कापूस बियाणे ऑनमध्ये विकले जात असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांकडून जादा मागणी असलेल्या कापूस बियाण्यांच्या पाकिटामागे ३०० ते ४०० रुपये ज्यादा घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट करून त्यांची कोंडी केली जात आहे. (Linking of Crop Seed Fertilizer Leads to Economic looting of farmers)

खरीप हंगाम शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे. येत्या काही दिवसांत हंगामाला सुरवात होणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आतापासून नियोजनाला सुरुवात केली आहे. यंदा कापूस बियाणे कंपन्यांना पावसाचा फटका बसला आहे. चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी केंद्रचालकांकडून व्यक्त होत आहे.

खरीपासाठी आतापासूनच शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांची बुकिंग सुरू केली आहे. काही ठराविक कापूस वाणांना शेतकऱ्यांची विशेष पसंती आहे. त्यामुळे मागणी असलेल्या वाणांचा पुरवठा जिल्ह्यात कमी होत आहे. १०० पाकीट बुकिंग करणाऱ्या विक्रेत्याला १० ते २० पाकिटे दिले जात आहेत.

कंपनीकडूनच कृत्रिम तुटवडा तयार केला जात असल्याची तक्रार कृषी केंद्र संचालक करत आहेत. त्यामुळे मात्र, कापसाच्या काही विशिष्ट वाणांची मागणी वाढली आहे. मागणी असलेल्या वाणाची विक्री ऑनमध्ये केली जात असून, कपाशी पाकीटावर ३०० ते ४०० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत.

यापूर्वी खतांसोबत इतर खतांची लिकिंग होत असल्याचा प्रकार होता, आता बियाण्यांची मागणी व उपलब्धता पाहता बियाण्यांसोबत ही लिकिंग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे आहे. काही वाणांना मागणी असल्याने वाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला बियाणे मिळावीत, यासाठी शेतकरी काळजी घेत आहेत. (latest marathi news)

कृषी सेवा केंद्रचालकांना पुरवठा कमी

आम्ही मागणी असलेल्या वाणाची बुकिंग आधीच केली आहे, कंपनीला पैसेसुद्धा दिलेत. हंगाम तोंडावर असताना मागणी असलेल्या बियाण्यांचा तुटवडा असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीकडून माल पाठविण्यात आला.

मात्र, एका पेटीतील दहा-दहा पाकीट तीन कृषी सेवा केंद्रचालकांना देण्यात आले. काही वाणांना मागणी असल्याने ऑनमध्ये विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रचालकांनी दिली.

ऑनलाइन पेमेंटला नकार

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यावर त्यांच्याकडून ऑनलाइन रक्कम स्वीकारण्याऐवजी रोकड घेण्यावरच कृषी केंद्रचालकांचा भर आहे. बिले मात्र, जूननंतर मिळणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

अमळनेर तालुक्यातील बी-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांना तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, कृषी अधिकारी अविनाश खैरनार, पर्यवेक्षक वंजारी, दीपक चौधरी यांनी भेटी दिल्या. यावेळी बियाण्यांची व खतांची उपलब्धता याविषयी माहिती घेत विक्रेत्यांना सूचना केल्या.

जास्त दरात बियाण्यांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. बियाणे खरेदीच्या वेळी पक्के बिल घ्यावे व पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT