Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे पक्ष भाजपसमोर उभे करणार कडवे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘काट्यानेच काटा काढला जातो’ असे म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे भाजपतील युवा नेता फोडून त्यांच्या उमेदवारीने शिवसेना ठाकरे गट जळगाव लोकसभा मतदार संघात असलेला ‘कमळा’चा काटा काढणार काय, याकडेच आता लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर केलेला भारतीय जनता पक्षही आता शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीच्या घोषणेकडे लक्ष देऊन आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ अनेक अर्थाने गाजणारा ठरत आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

विद्यमान खासदारांची उमेदवारी सलग दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये कापली आहे. तर गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेऊन प्रचार सुरू केला होता, परंतु त्यांना यश आले नाही. यावेळी नेमके उलटे घडत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाने प्रथमच आपला उमेदवार जाहीर केला.

माजी आमदार स्मिता वाघ यांचे नाव त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा प्रचारही पक्षातर्फे सुरू झाला आहे. परंतु महाविकास आघाडीत ठाकरे गटाकहे हा मतदार संघ असून अद्यापही त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. ठाकरे गटाकडे जळगाव लोकसभा मतदार संघ गेल्या ३५ वर्षात प्रथमच आलेला आहे.

भाजप- शिवसेना युती असतांना अनेक वेळा पक्षाने हा मतदार संघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपने नेहमीच या मतदार संघावर आपला हक्क कायम ठेवला आहे. आता महाविकास आघाडीत भाजप समोर शिवसेना ठाकरे गट आहे. त्यांच्याकडे हा मतदार संघ आल्याने त्यांना भाजपशी जळगाव जिल्ह्यात प्रथमच लोकसभेत दोन हात करण्याची संधी मिळाली आहे.

त्यामुळे शिवसेना ठाकरे गट तगडी फाईट देऊन यश मिळविणाऱ्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे अनेक इच्छुक आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाकडे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापल्याने तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. (jalgaon political news)

भाजपचे खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचे सख्य आहे. पाटील यांची उमेदवारी कापल्याने त्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या उमेदवारीसाठी विरोधी ठाकरे गटाकडे प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी करण पवार यांनाच उमेदवारी करण्याबाबत सूचविले.

मात्र हा मतदार संघ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण पवार यांच्या उमेदवारीची शिफारस केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपमधीलच युवा नेता पारोळा येथील माजी नगराध्यक्ष असलेला तसेच घराण्यातही राजकीय वारसा असलेला करण पवार यांच्या माध्यमातून उमेदवार मिळत असल्याने पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्यास तयारी दर्शविल्याचे सागंण्यात येत आहे.

भाजपकडील युवा नेता आपल्याकडे त्यांच्या माध्यमातून भाजपलाच पराभूत करण्यासाठी शिवसेनेकडे चालून आलेली ही संधी आहे. अद्याप ही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी करण पवार यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गट भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापुढे कडवे आव्हान उभे करणार आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यास आपल्या गेल्या अनेक वर्षांचा बालेकिल्ला ढासळू न देण्यासाठी भाजपला अधिक जोमाने प्रयत्न करावे लागण्याचे चित्र दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT