Jalgaon & Raver Lok Sabha esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha: मशाल, कमळ, आईस्क्रीम, हत्ती, फळांची टोपली, तुतारी अन्‌ बरंच काही! अबब 38 उमेदवारांचे चिन्हे लक्षात कशी ठेवणार

Lok Sabha Election 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. जळगाव मतदारसंघात १४ उमेदवारांची १४ चिन्हे, तर रावेर मतदारसंघात २४ उमेदवारांची २४ चिन्हे आहेत. ही चिन्हे कशी लक्षात ठेवावीत, असा प्रश्‍न मतदारांसमोर आहे. (Jalgaon Lok Sabha 38 candidates different options people confuse)

एका उमेदवाराची प्रचार फेरी घराकडून गेली, की दुसरी, मग तिसरी, अशा एका पाठोपाठ एक प्रचार फेऱ्या निघत असल्याने मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. मात्र, एवढे चिन्हे आणि तेही लवकर लक्षात नाहीत. उमेदवारही आवर्जुन मतदार भेटीत आपल्या नावाचा कागद, चिन्ह देऊन अमूक चिन्हाकडे लक्ष द्या, असे सांगत आहेत.

माघारीनंतरी रिंगणातील सर्वच उमेदवार आता प्रचाराला लागले आहे. यामुळे निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. १३ मेस मतदान असले, तरी उमेदवारांना केवळ ११ दिवसच प्रचाराला मिळणार आहेत. त्या दिवसांत आपापल्याला मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना भटकंती करताना दमछाक होत आहे. लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ मोठे आहेत.

प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक रात्रन्‌दिवस प्रयत्न करीत आहेत. लवकरच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू होणार आहेत. यामुळे एकीकडे प्रचार सभांची तयारी, तर दुसरीकडे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली, मेळावा, सभांमुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली चिन्हे अशी

जळगाव मतदारसंघात- मशाल, हत्ती, कमळ, सीसीटीव्ही कॅमेरा, सिलिंडर, गळ्याची टाय, आईस्क्रीम, ऑटो रिक्षा, नरसाळे, शिवण यंत्र, ऊस शेतकरी, प्रेशर कुकर, बॅट, अशी चिन्हे मिळाली आहेत.

रावेर मतदारसंघात- फळांची टोपली, हॉकी आणि बॉल, कमळ, हत्ती, तुतारी वाजविणारा माणूस, सिलिंडर, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, संगणक, ऑटो रिक्षा, तुतारी, ट्रक, शिट्टी, ऊस शेतकरी, बॅट, दूरदर्शन, एअर कंडिशनर, कपाट, खाट, पाटी, सफरचंद, बासरी, बेबी वाकर, जहाज, अशी चिन्हे मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT