Lok Sabha Election 2024 esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : चहा-नाश्ता, जेवणासह हार, शालीचा दर निश्चित! अर्ज भरल्यापासून द्यावा लागणार हिशेब

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांपर्यंतच खर्च करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांपर्यंतच खर्च करता येणार आहे. स्थानिक बाजारपेठांचे सर्वेक्षण करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चहा, नाश्ता, जेवण, स्पेशल थाळी, राहण्याची खोली, पाणी बाटली, नारळ, शाल, पुष्पहार, सतरंजी, पक्षांचे झेंडे, पताका, बॅनर यांचे दर किती असावेत, हे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले आहेत. त्यानुसारच खर्च करणे व त्याचा हिशोब देणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 expenditure marathi news)

निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देताना उमेदवारास बिस्कीटसाठी पाच ते दहा रुपयास एक पाकीट, अशा निश्चित दरातच खर्च करून त्याचा हिशोब जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.

निवडणूक काळातील फटाक्यांचे शॉट, रिक्षासह विविध वाहने, प्रचाराचे पोस्टर, हॅण्डबिल, बॅनर, पोस्टर, डिजिटल बॅनर, पेन्डॉल, सतरंजी, टेबल, सोफासेट, खुर्ची, मंडप, फुलांचा हार लहान-मोठा, लाइट फिटिंग, जनरेटर, फेटा, शाल, मफलर, टोपी, गांधी टोपी, कापडी झेंडा, हॉटेल, लॉजवरील राहणे व तेथील जेवण, अशा विविध बाबींचे दर सध्याची महागाई विचारात घेऊन निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, शहरी व ग्रामीण भागात बऱ्याच बाबींचे दर सारखेच असून, बहुतेक मतदार ग्रामीणमध्येच आहेत. तरीही निवडणुकीसाठी उमेदवारांना मर्यादितच खर्च करावा लागणार आहे.  (latest marathi news)

असे राहणार खर्चाचे बंधन....

निश्‍चित केलेले दर असे

*चहा कट ५, साधा ७, स्पेशल १० रुपये

*कॉफी व दूध शहरात ७ ते १५ रुपये

*व्हेज थाळी राइस प्लेट १००, स्पेशल राइस प्लेट १५०

*नॉनव्हेज थाळी १०० ते २०० रुपये

*पाणी जार १८ रुपये (२० लिटर)

*उसाचा रस २० रुपये

* लिंबूपाणी प्रतिग्लास १० रुपये

*फळांचा रस २० रुपये

*लस्सी ३० रुपये

*नारळ पाणी १० रुपये

*केळी ३० (डझन)

*भेळ ३० रुपये

*पोहे १० ते ३० रुपये

*पुष्पहार, बुके २० ते १०० रुपये

*शाल ६० ते ९५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT