Sharad Pawar, Uddhav Thackeray & Balasaheb Thorat esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election: जळगाव, रावेरमध्ये ‘महाविकास’च्या उमेदवारांचा तिढा कायम! नेत्यांकडून सक्षम पर्यायासाठी चाचपणी

Jalgaon News : लोकसभा निवडणूकीतील जळगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाला तर रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पक्षाला अद्याप आपला उमेदवार निश्‍चित करता आलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : लोकसभा निवडणूकीतील जळगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाला तर रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पक्षाला अद्याप आपला उमेदवार निश्‍चित करता आलेला नाही. उद्या (ता.२७) उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Mahavikas aghadi marathi news)

लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेतून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विरोधी महाविकास आघाडीतर्फे कोण उमेदवार असणार याची प्रतिक्षा आहे.

ठाकरे गटाची पारोळ्यात चाचपणी

जळगाव लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यांच्यातर्फे जळगावचे माजी महापौर कुलभूषण पाटील व अमळनेर येथील ललिता श्‍याम पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय बाहेरचा उमेदवारही शोधण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

त्यात पारोळा येथील राजकीय घराण्यात अनुभव असलेल्या एका नेत्याला शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या नेत्याचे पारोळा तालुक्यासह सर्व ठिकाणी नातेसंबंध तसेच कार्यकर्त्यांचे जाळे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम टप्प्यात पक्षात प्रवेश करून त्यांची उमेदवारी निश्‍चित होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.  (latest marathi news)

शरद पवार गटातर्फे पाटील

रावेर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शरद पवार पक्षाकडे गेला आहे. त्या पक्षातही उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाला आहे. पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी तयारी उमेदवारीची तयारी दर्शविली होती, परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी माघार घेतली, त्यानंतर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने ठराव केला होता.

मात्र त्यांनी विधानसभेची तयारी करीत असल्याचे सांगून उमेदवारीला नकार दिला.पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी तयारी दर्शविली आहे. तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून त्यांचीही तयारी आहे. त्यामुळे पक्षातर्फे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

महाविकास आघाडीतर्फे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत नुकतीच बैठक घेण्यात आली आहे. राज्यातील उमेदवारही निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या (ता. २७) रोजी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून त्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही निश्‍चित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT