smita wagh  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : गेल्या वेळी हुकलेली बाजी यंदा स्मिताताईंनी राखली; पती उदय वाघ यांना विजय समर्पित

Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी स्मिताताई वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देऊनही ऐनवेळी रद्द केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी स्मिताताई वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देऊनही ऐनवेळी रद्द केली. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे अचानक निधन झाले, त्यानंतर पक्षनिष्ठा कायम ठेवून या वेळी स्मिता वाघ यांनी उमेदवारी मिळवून मोठे यश मिळविले. पती उदय वाघ यांना हा विजय खऱ्या अर्थाने समर्पित करीत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यावर दोन लाख ४७ हजार ११४ मतांनी विजय मिळविला. ()

स्मिता वाघ या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या आहेत. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्या, तसेच अध्यक्ष झाल्या. पक्षाने त्यांना विधान परिषदेत आमदार केले. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. गेल्या २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. अर्ज भरून त्यांनी प्रचार केला होता. (latest political news)

मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, ते विजयी झाले. मात्र, नाराज न होता स्मिता वाघ यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले. परंतु, याच काळात पतीचे निधन झाले. तरीही खचून न जाता त्यांनी राजकीय कार्य, जनसंपर्क सुरूच ठेवला. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्याच्या बळावर पक्षाची उमेदवारी मिळविली.

त्यानंतर त्यांना जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील यांची साथ मिळाली आणि त्या आज विजयी झाल्या. आपल्या पत्नीला खासदार करण्याचे पतीचे स्वप्न पूर्ण करून त्यांनी आपल्या पतीला आदरांजली अर्पण केली आहे. यात जनतेने त्यांना भरभरून साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT