Barcode banner in the ward esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मतदार शोधण्यासाठी प्रत्येक वॉर्डात बारकोड बॅनर!

Jalgaon News : भारत हा लोकशाही देश असून मतदानाच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.

संजय पाटील

पारोळा : भारत हा लोकशाही देश असून मतदानाच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मतदार जागृती कार्यक्रम राबविले जातात. पण या सगळ्यात पारोळा नगरपालिकेचा एक उपक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. (Jalgaon Lok Sabha Election Barcode banner in every ward to find voters)

पारोळा नगरपालिकेने प्रत्येक वॉर्डात क्युआर कोड बॅनर लावले असून त्यामुळे मतदार यादीत नाव शोधणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. मतदार जागृतीच्या विविध उपक्रम किंवा महाविद्यालय स्तरावर पथनाट्य, जनजागृती व विविध भित्तिपत्रिका किंवा प्रचार पत्रकाच्या माध्यमातून जनमानसात मतदानाचा हक्क व अधिकार याबाबत नागरिकांना नेहमी माहिती देत असतात.

दरम्यान होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा व आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची पडताळणी करावी यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार येथील नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून पालिकेने शहरातील १० वार्डात तसेच शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणी बारकोड बॅनर व स्टिकरचे बॅनर लावून मतदार यादीत आपले नाव शोधा या थीमने शहरात बॅनर लावून जास्तीत जास्त नागरिकांना आपले नाव सहजपणे शोधता येईल यासाठी शहरात ही बॅनर लावले आहेत. (latest marathi news)

बराच वेळा मतदार यादीत नाव शोधणे साठी नागरिकांना पायपीट किंवा पूर्ण यादी शोधावी लागते. त्यामुळे बऱ्याचदा मतदार हा नाव आहे किंवा नाही याविषय साशंक असतो. त्यामुळे देखील मतदानाचा टक्का कमी होण्याचे प्रमाण जाणू लागते.

मात्र नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा अधिकार बजवावा व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज मनात जागृती करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादीत आपले नाव व शोधा या संकल्पनेच्या माध्यमातून बारकोड बॅनर शहरातील १० वार्डात लावले आहेत.

"शहरातील नागरिकांना आपले नाव शोधणे सोपे व सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बॅनर व स्टिकर लावण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा." - किशोर चव्हाण (प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद पारोळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT