Eknath Khadse, Sharad Pawar esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : भाजप प्रवेशानंतरही खडसेंची ‘आमदारकी’ राहणार; शरद पवारांची हमी

Jalgaon Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यामुळे त्यांना विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

त्यामुळे भाजपमध्ये गेले तरी त्यांची आमदारकी कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी आपण भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत आहोत अशी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षातील केंद्रीय नेतृत्वाने आपल्या घरवापसीला मान्यता दिली असून येत्या काही दिवसात ते आपला प्रवेश करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील घरवापसीचा प्रवेश दिल्ली येथे पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीतच होणार असल्याचे सांगितले जात असून खडसे यांनीच तसे सूतोवाचही केले आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. पक्ष फुटल्यानंतर खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटासोबत राहिले. (jalgaon political news)

आता ते भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे खडसे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

खडसे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू असतांनाच पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलतांना आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. एकदा आपण दिलेल्या गोष्टी माघारी घेत नाही असेही पवार यांनी सांगितले.

खडसेंच्या पक्षातंराबाबत शरद पवार म्हणाले, त्यांच्या इतक्या चौकशा सुरू करण्यात आल्या, त्यांची व्यक्तिगत संपत्ती जप्त करण्यात आली, त्यांना दैनंदिन कुटूंब चालविणेही कठीण झाल्यामुळे ते हतबल झाले होते. त्यामुळे ‘जिथे जावून तुम्हाला सोयीस्कर होणार आहे, तेथे तुम्ही जावा’ असे आपण त्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT