Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : भाजप पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; भाजपचा एक गट प्रचारापासून अलिप्त

आल्हाद जोशी

एरंडोल : तालुक्यातील भाजप पदाधिका-यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षाचे दोन माजी नगराध्यक्ष, दोन माजी उपनगराध्यक्ष,अनेक माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी लोकसभेच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. भाजप पदाधिका-यांमध्ये असलेले मतभेद मिटवण्याचे आव्हान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभे राहिले आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत विश्वासात घेतले जात नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात भाजपचे संघटन मजबूत असले तरी मागील तीन वर्षांपासून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.भाजपच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद मिटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

पक्षाचे दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी एकमेकांबद्दल एकेरी भाषेचा वापर करून अपमान करण्याचा प्रयत्न करीत आहेत.भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नसला तरी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर निश्‍चित होण्याची शकयता आहे.

शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे सर्वसामान्य कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षाचे दोन माजी नगराध्यक्ष, दोन माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक,पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. (Latest Marathi News)

भाजपचे विद्यमान पदाधिकारी विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमांपासून डावलण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर होण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हास्तरीय वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद मिटवण्याऐवजी एकाच गटाला प्राधान्य देवून मतभेद वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यक्रमांपासून हेतूपुरस्करपणे दूर ठेवले जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी नुकतीच शहरातील व्यावसायिक.

सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या मात्र या वेळी देखील दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करतांना जाणीवपूर्वक एका गटातील कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद त्वरित न मिटवल्यास त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची भीती कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे अनेक कार्यकर्ते दोन्ही गटांपासून अलिप्त राहून मतभेद मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

पक्ष संघटनेतील विद्यमान प्रमुख पदाधिकारी माजी खासदार उन्मेष पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार भाजपमध्ये असतांना यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.पक्षाच्या हितासाठी वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देण्याऐवजी मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT