Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : चोपडा मतदारसंघांत नव मतदारांचा उत्साह; आदिवासी भागातही मतदानाचा टक्का वाढला..!

Lok Sabha Election : चोपड्यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शांततेत मतदान पार पडले. सकाळी सातपासून ११ वाजेपर्यंत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : चोपड्यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शांततेत मतदान पार पडले. सकाळी सातपासून ११ वाजेपर्यंत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यानंतर दुपारी चार नंतर पुन्हा मतदान केंद्रावर रांगा दिसल्या. नव मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. चोपडा मतदार संघात सहापर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाले. यात वयोवृद्ध मतदार आणि आदिवासी गावात टक्का वाढला. ( voter turnout also increased in tribal areas )

जिल्ह्यातील पाहिले मतदान केंद्र असलेल्या मोरचिडा आणि सोबतच अमलवाडी,उमर्टी, गौऱ्यापाडा,सत्रासेन,वैजापूर आदी. आदिवासी बहुल भागात कधी नव्हे तो उत्साह मतदारांत दिसून आला या भागात ७५ ते ८० टक्के मतदान झाले. आज झालेले मतदान नेमके कोण्याच्या पारड्यात जाते याचा आराखडा सहज बांधता येत नसून शहरात मात्र तरुणाई मधील उत्साह बरच काही सांगत होता. (latest marathi news)

मुस्लिम मतदार देखील मोठया प्रमाणात मतदानाला बाहेर पडताना दिसला. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक काळात मोठ्या जनजागृतीचा परिणाम दिसला. मतदारांच्या गर्दीच्या रुपाने मतदान केंद्रांवर उत्साह दिसला.

रेड कार्पेट टाकून स्वागत

अनेक केंद्रांवर मतदारांसाठी रेड कार्पेट टाकून स्वागत झाले. काही केंद्रांवर स्वागत गेट,कमानी, सावली साठी मंडप, पिण्यासाठी थंड पाणी,सेल्फी पॉइंट, मतदारांसोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तात्पुरते खेळणी घरं, दिव्यांगांसाठी, वयोवृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर अशा विविध सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील कुरवेल व शहरातील मेमोसा हायस्कूलमध्ये मतदानापूर्वी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. परंतु तो मतदान सुरु होण्यापूर्वीच दुरुस्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT