अतिक्रमणधारकांकडून ‘पीआय’सह पोलिसांना मारहाण sakal
जळगाव

जामनेर : लोणीत अतिक्रमणधारकांकडून ‘पीआय’सह पोलिसांना मारहाण

अतिक्रमण काढण्यास विरोध; सहा जणांना अटक; एक फरारी

सकाळ वृत्तसेवा

फत्तेपूर/पहूर (ता. जामनेर) : येथून जवळच असलेल्या लोणी गावात ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण काढणे सुरू असताना, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी शिवीगाळसह मारहाण केली. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहा संशयितांना अटक झाली आहे, तर एक जण फरारी झाला आहे.

येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसमोर काही व्यक्तींनी पत्र्याचे शेड व इतर जागा सांभाळून अतिक्रमण केले होते. ते काढण्यासाठी गुरुवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार पहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलिस कर्मचारी किरण शिंपी, दिनेश मारवडकर, महिला कर्मचारी विद्या छाडेकर, वाहनचालक मोरे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. या कार्यवाहीवेळी दत्तू कडू उगले, भास्कर काशिनाथ वाघ, ज्ञानेश्वर कडू उगले यांनी विरोध करून पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना पोलिस वाहनात बसविले.

मात्र, त्यांनी वाहनाबाहेर येऊन इतर साथीदारांसह धनवडे यांच्यासह सहकाऱ्यांना मारहाण केली. सर्व पोलिसांनी मिळून त्यांना ताब्यात घेतले व पहूर पोलिस ठाण्यात नेले. दुपारी धनवडे पथकासह लोणी येथे पुन्हा आले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने अतिक्रमण काढले. पाचोऱ्याचे पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी लोणी गावास भेट दिली. दरम्यान, लोणी गावात पोलिसांची कुमक बोलविली असून, गावासह परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

यांना घेतले ताब्यात

या प्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. यात दत्तू उगले, भास्कर वाघ, ज्ञानेश्वर उगले, महादू उगले, कीर्तीराज उगले, सागर उगले यांचा समावेश आहे. तर पवन महादू उगले हा फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT