Lok Sabha Election
Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव,रावेरच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या इच्छुकांची मुंबईत खलबते

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : महाविकास आघाडीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी निश्‍चीतीसाठी मुंबईत खलबते सुरू आहेत. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवार मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येत्या दोन दिवसात दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहिर होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

तर रावेर मतदार संघ शरदचंद्र पवार गटाकडे आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटातर्फे माजी महापौर कुलभूषण पाटील, ललिता पाटील इच्छुक आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर चाळीसगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व जिल्हा दूध संघाचे संचालक, चाळीसगाव येथीलच शिक्षण क्षेत्रातील दिग्गज ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत.

हे सर्व मुंबईत आहेत. त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व संजय सावंत यांच्याशी भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्येकाने ही भेट वैयक्तीक घेतली असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत अद्याप ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. (latest marathi news)

रावेरसाठीही चर्चा

रावेर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे. पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र माजी आमदार संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, मुक्ताईनगर येथील मक्तेदार विनोद सोनवणे यांच्या नावाचीही आता चर्चा सुरू झाली आहे.

मक्तेदार विनोद सोनवणे यांनी आज मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असल्यामुळे उमेदवारीबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रावेरच्या उमेदवाराची घोषणाही दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT