Sunil Devare, the leader of Farmers' Association, while giving information in a press conference. esakal
जळगाव

Jalgaon News : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मोर्चाला यश! सुनील देवरे यांची माहिती; 7 हजार 788 कोटीचा निधी मंजूर

Latest Jalgaon News : महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी विभाग दिल्ली, राज्य कृषी विभाग मुंबई, कृषी आयुक्तालय पुणे आदींशी पत्र व्यवहार केला.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ९ ऑगस्टला क्रांती दिनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना घेऊन विविध मागण्यासंदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांना यश आले आहे, अशी माहिती सुनील देवरे यांनी सांगितले. (Maharashtra Farmers Association march is success)

सुक्ष्म सिंचन अंतर्गत सन २०२२ पासून शेतकऱ्यांना सबसिडी मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विम्याचा ३० एप्रिल २०२४ चा निर्णय रद्द करावा, नार-पार नदीजोड प्रकल्प तत्काळ मंजूर करावा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी विभाग दिल्ली, राज्य कृषी विभाग मुंबई, कृषी आयुक्तालय पुणे आदींशी पत्र व्यवहार केला. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चा देखील काढला होता. (latest marathi news)

त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नार-पार संदर्भात राज्यपालांचे पत्र दिले. ५ सप्टेंबरला सुक्ष्म सिंचनच्या १३२ कोटीच्या पूरक अनुदानाचा अध्यादेश काढण्यात आला. नार- पार नदीजोड प्रकल्पासाठी ७ हजार ४६५.२९ कोटीचा अध्यादेश काढून २३ रोजी ३ लाख ७८ हजार १०१ ची निविदा प्रक्रिया सुरू झाली.

एकूणच आपल्या संघटनेने केलेल्या आंदोलनामुळेच मंजुरी मिळाल्याचा दावा सुनील देवरे यांनी केला आहे. पुढील काळात केंद्र व राज्य शासनाकडे सुक्ष्म सिंचन संदर्भातील येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अजून प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री. देवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT