Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Scheme esakal
जळगाव

Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Scheme : जळगाव जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाखांचा लाभ!

Latest Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी सात लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची रक्कम ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजार ६७० कोटी रुपये शासनाने जमा केले आहेत. (Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Scheme)

जळगाव जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी सात लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातील १४० शेतकऱ्यांना ६८ लाख, नंदुरबार जिल्ह्यातील १३८ शेतकऱ्यांना ६८ लाख व नाशिक जिल्ह्यातील ७१३ शेतकऱ्यांना तीन कोटी ५४ लाखांचा लाभ देण्यात आला आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याचे ऑगस्टमध्ये शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले नव्हते. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची संधी १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दिली होती. (latest marathi news)

या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६ कोटी ७० लाखांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होणार आहे.

या योजनेत राज्यात २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीककर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे, अशा एकूण १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण पाच हजार ३१० कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT