MahaYuti esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मेळावा लोकसभेचा चर्चा मात्र पालिकेची!

Jalgaon Lok Sabha Election : महायुतीचा पहिला कार्यकर्ता मेळावा तब्बल अडिच तास उशिरा सुरू झाला मात्र जमलेल्या कार्यकर्त्यांचा गप्पाचा विषय लोकसभा निवडणुक नव्हता तर चक्क आगामी पालिका निवडणुका हाच होता.

श्रीकांत जोशी

भुसावळ : येथे महायुतीचा पहिला कार्यकर्ता मेळावा तब्बल अडिच तास उशिरा सुरू झाला मात्र जमलेल्या कार्यकर्त्यांचा गप्पाचा विषय लोकसभा निवडणुक नव्हता तर चक्क आगामी पालिका निवडणुका हाच होता. कोण कुठून उभा राहिल, संबंधित वॉर्ड राखीव झाला तर काय होईल, माझी तयारी कुठून आहे असे चर्चेचे विषय होते. (Jalgaon Lok Sabha Election)

स्टार लॉनमधील राजवाडा हॉल भागात रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा पहिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. वेळ सायंकाळी पाच वाजेची दिली होती. भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. साडे सहा वाजेपर्यंत कार्यकर्ते हॉल बाहेरच गप्पा मारत बसले होते. आत गेल्यावर देखील प्रत्यक्ष मेळावा साडेसात वाजता सुरू झाला.

त्यामुळे दरम्यानच्या काळात माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांच्यात आगामी पालिका निवडणुका आपल्या वॉर्डातील समस्या यावर चर्चा रंगत होत्या. एक इच्छुक म्हणाला, ‘मी दोन वॉर्डातून तयारी करत आहे. मात्र कोणता वॉर्ड एस.टी. साठी राखीव होतो त्यानुसार निर्णय घेईल. अर्थात आमदार साहेबांनी संधी दिली पाहिजे.’

तर दुसरा इच्छुक म्हणाला, ‘माझा भाऊ गेल्यावेळेस अगदी थोड्या मतांनी पराभुत झाला. आता मात्र इतर सर्व कामे कमी करुन फक्त वॉर्डातील कामावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे विजय निश्चित होईल.’ तर दुसरीकडे माजी नगरसेवकांच्या ग्रुपमध्ये व्हॉल्व्ह खराब असल्याने आमच्या वॉर्डात व्यवस्थित पाणी येत नाही यावरदेखील चर्चा रंगली होती. (latest marathi news)

टायगर अभी जिंदा है.....पण....

वॉर्डाच्या गप्पा सुरू असतानाच एकाने विषय काढला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव निश्चित झाल्याचे समजले. असे सांगताच दुसरा म्हणाला तसे काही नाही. तेव्हा तो म्हणाला चौधरी यांचे मध्यंतरी जंगी स्वागत व रॅली निघाली यावरुन त्यांनी दाखवून दिले, टायगर अभी जिंदा है !

त्यावर दुसऱ्याने तत्काळ प्रतिक्रिया दिली, ‘लेकिन टायगर को पकडने के लिए पिंजरे भी तय्यार है !’ आणि एकच हंशा पिकला. एकेकाळी त्या टायगरच्या जंगलात आपण देखील होतो. पण कोणता प्राणी होतो हे ज्याने त्याने समजुन घ्यावे, असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT