Farmers standing in desperation in case of fire. esakal
जळगाव

Jalgaon News : शेतात कापून ठेवलेला मका आगीत खाक; मांडवे येथे वीजतारांच्या घर्षणाने घडली घटना

Jalgaon News : मांडवे खुर्द येथील शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मका पिकाला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मांडवे खुर्द येथील शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मका पिकाला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या आगीत एक लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी प्रल्हाद नामदेव आढाव यांनी व्यक्त केला असून, याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आली आहे.

मांडवे ते जामनेर जाणाऱ्या रस्त्यावर लोंबकळत असलेल्या वीजतारांना वाहनाच्या स्पर्श झाला. त्यामुळे तार एकमेकांना लागून तारांचा शार्टसर्किट झाला. (Jalgaon Maize that is cut in field is charred by fire incident took place in Mandave due to friction of electric wires)

ही घटना खांडवे शिवारातील गट क्रमांक २४/२ घडली. अडीच एकर क्षेत्रात काढणीसाठी आलेला मका कापणी करण्यात आला होता. त्या शेतात मका कापलेला व वाळलेला असल्यामुळे शार्टसर्किटमुळे जोरात आग लागली.

शेतात काम करीत असलेल्या शेतमालकाचा मुलगा रामलाल प्रल्हाद आढाव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आरडाओरडा करून जळत असलेल्या मका व कडब्याला लागलेली आग गावकऱ्यांच्या मदतीने विझविण्यात आली. (latest marathi news)

या वेळी परिसरातील शेतकरी अर्जून वाघ उत्तम लोखंडे, विशाल पाटील, भास्कर पाटील, श्‍यामराव इसळकर, संतोष भोंडेकर, योगेश पाटील यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

या आगीत काढणीसाठी आलेल्या मक्याचे अंदाजे एक लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तोंडापूर वीजवितरण कंपनीचे अभियंता करपाते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सायंकाळी शेतात पाहणी केली. शेतमालाचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी प्रल्हाद आढाव यांच्याकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT