Maize, urad, mung  esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : मका, उडीद, मुगाचा पेरा वाढला! जिल्ह्यात 97 टक्के पेरण्या

Jalgaon News : जिल्ह्यात कापसाला मागील वर्षी मिळालेला कमी दर पाहता, यंदा शेतकऱ्यांनी मका, उडीद, मूग, तुरीचा पेरा वाढविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात कापसाला मागील वर्षी मिळालेला कमी दर पाहता, यंदा शेतकऱ्यांनी मका, उडीद, मूग, तुरीचा पेरा वाढविला आहे. मागील वर्षी मक्याला २८०० ते ३ हजारांचा दर, तर उडीद, मूग, तुरीला सरासरी ८ ते साडेआठ हजार रुपयांचा दर मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा केला. (Jalgaon Agriculture News)

मात्र, तो मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात खरिपाच्या आतापर्यंत ९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात यंदा खरिपाचा ७ लाख ५९ हजार ६०१ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी-बियाणे, खतांचे नियोजन केले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरवात केली.

पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधारेने शेतात पाणी साचले होते. मात्र, मंगळवारी (ता. ३०) दिवसभर सूर्यप्रकाश असल्याने शेतकरी शेतात आंतरमशागत करताना दिसून आले. अजून दोन दिवस तरी पावसाने उघडीप दिल्यास शेतातील तण काढून, खते देण्यासाठी वेळ मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटते. (latest marathi news)

जिल्ह्यात आतापर्यंत ३७० मिलिमीटर

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या (६३२ मिलिमीटर) आजपर्यंत ३७० मिलिमीटर अर्थात ५६.७ टक्के पाऊस झाला आहे.

"यंदा मका, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. कपाशीचा पेरा सरासरीपेक्षा कमी आहे. मक्याला २८०० ते तीन हजारांचा दर, उडीद, तूर, मुगाला ८ ते ८५०० दर मिळाला होता."- के. एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

जिल्ह्यात झालेल्या पेरण्या अशा

*कापूस : ५ लाख ९ हजार ५८ हेक्टर

*मका : १ लाख १७ हजार ४५९

*सोयाबीन : १८ हजार २७३

*ज्वारी : १५ हजार ५५०

*बाजरी : ६ हजार १२१

*तूर : १३ हजार ८३१

*मूग : १४ हजार ९०८

*उडीद : १४ हजार ८४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT