2 injord in omni twowheeler accident
2 injord in omni twowheeler accident  
जळगाव

सुसाट ओमनीच्या धडकेत दोन बांधकाम मजुर अंत्यवस्थ दोन गंभीर

सकाळ वृत्तसेवा


जळगाव,: - शिरसोली येथील तीन जण बांधकाम मिस्तरी काम करण्यासाठी मोटारसायकल वरून जाणाऱ्या तिघांना मारुती ओमनीने शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेज जवळ समोरून ठोकले यात दोन जण गंभीर तर एक जण जखमी झाले आहे. या तिघांना गोदावरी मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान ओम्नी चालकही या अपघातात किरकोळ हा किरकोळ जखमी झाला असल्याचे कळते . 

घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार, शिरसोली येथील राहुल शांताराम पाटील (वय-25), भूषण शाम मिस्तरी (वय-24), व सागर नाना पाटील (वय-25) सर्व राहणार शिरसोली प्र.न. येथील अशोकनगर परिसरातील भोलेनाथ नगर व स्वामी समर्थ मंदिर जवळील हे तिघे आज शिरसोली कडून सकाळी 7 वाजता जळगाव येथे बांधकाम साईटवर कामासाठी मोटारसायकल (क्र.एम.एच-19. डी.के.9890) ने घरून निघाले होते. जळगाव कडून शिरसोली कडे भरधाव येणाऱ्या सुसाट ओमनी (क्र. एम.एच-19सीएफ.3754) ने रायसोनी कॉलेज जवळील उतारावर समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार राहुल पाटील,सागर पाटील हे दोघे गंभीर जखमी असून तिसरा स्वार भूषण मिस्त्री हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रकाश पवार, सचिन पाटील, नीलेश भावसार, राजेंद्र ठाकरे अशांनी घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. 

दोघे गंभीर.. 
दोघे गंभीर जखमीची तब्येत चिंताजनक आहे. तर, ओमनी चालकालाही मार लागला आहे, याबाबत पोलिसांत अद्याप कुठलीही नोंद झाली नसून मारुती ओमनी ही जळगाव येथील पोपट कोल्हे यांच्या मालकीची असल्याचे आरटीओ येथील ऑनलाईन नोंदणी नुसार पोलिसांनी माहिती घेतल्यावर समोर आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT