jalgaon corona update sakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

जळगाव जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग तीव्र असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगाने वाढले आहे. दोन महिन्यांतच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोचला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६४ नवे रुग्ण आढळून आले तर १५९ रुग्ण बरेही झाले. (jalgaon-coronavirus-update-recovery-ratio-growth-district)

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता ओसरल्याचे चित्र आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट घातक होती, मात्र या लाटेत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढले. मे महिन्यापाठोपाठ जून महिन्यातही सातत्याने नव्या रु्ग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

मंगळवारी ४ हजार ५३१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ६४ नवे रुग्ण समोर आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४१ हजार ६५८ झाली. दिवसभरात तर १५९ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३७ हजार ३६१वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला. बळींचा आकडा २५६४ झाला आहे.

सर्वच तालुके दहाच्या आत

जिल्ह्यातील जळगाव शहरासह सर्वच तालुक्यांमध्ये मंगळवारी नव्या रुग्णांचा आकडा १०च्या आत नोंदला गेला. जळगाव शहर : २, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ५, अमळनेर ५, चोपडा ५, पाचोरा ४, भडगाव १, धरणगाव ३, यावल ३, एरंडोल २, जामनेर ४, रावेर ७, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर १, बोदवड ३, अन्य जिल्ह्यातील २.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

Satej Patil Dhananjay Mahadik : मुश्रीफ -राजे गटाचं काय घेऊन बसलाय, कोल्हापुरात बंटी -मुन्ना गट आला एकत्र; 'कागल'पेक्षा शिरोळचं राजकारण तापलं

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Latest Marathi News Update LIVE : पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

SCROLL FOR NEXT