A liquor store was blown up near the police station 
जळगाव

अरेच्चा..दारुड्यांनी पेालिस चौकी शेजारीच दारुदुकान फोडले

रईस शेख


जळगाव,ता. १३ ः- शहरातील शिरसोली नाका परिसरातील आदर्शनगर पोलीस  चौकी शेजारील देशी दारू दुकान फोडून तेरा हजारांच्या दारुसाठ्यासह रोकड आणि दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरा चोरट्यांनी लंपास केला आहे. मॅनेजर संतोषसींग टाक याच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव शहरात ७ ते १३ जुलै दरम्यान कडक लाकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. जळगाव शहरातील सर्वच आस्थापनांसह दारू विक्रीची दुकाने लॉकडाऊन काळात स्टॉक सील करून बंद करण्यात आलेली आहे. गेल्या सात दिवसांपासून दुकान बंद असल्याचा गैर फायदा घेत भामट्यांनी डी मार्ट शेजारील राजेशसींग सराफ यांच्या नावे लायसन्स असलेले देशी दारूविक्रीचे दुकान फोडले. दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील तेरा हजारांच्या देशी दारूसह किरकोळ रक्कम आणि चोरीची घटना कैद झालेले सीसीटीव्ही यंत्रणेचे डीव्हीआर चोरुन नेला आहे. मॅनेजर संतोसींग टाक यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नेांद करण्यात आली आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT