Insomnia  Insomnia
जळगाव

सततच्या मोबाईल वेडाने अनेकांची उडाली झोप!

‘वर्क फ्रॉम होम’ने दिवस अन्‌ रात्रीत काही फरक उरला नाही.

देविदास वाणी

जळगाव ः कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) यंदाही विद्यार्थ्यांना (Student) ऑनलाईन अभ्यास (Online practice)शिकविला जात आहे. वर्क फ्रॉम होम (Work from Hoom) , दिवसभराचा रिकामा वेळ, पण त्या मानाने काम कमी, घरातच बंदिस्त असल्याने आळसपणा वाढत आहे. वेळ घालविण्यासाठी प्रमाणपेक्षा अधिक वेळ टीव्ही (TV), मोबाईलवर (Mobail) घालविण्यामुळे १६ महिन्यांत घराघरांतील लहान मुलांपासून नोकरदार, वयोवृद्धापर्यंत सगळ्यांची झोप उडाली आहे. अनेकांची अवस्था सोफ्यात बसलेले बटाट्या (काऊच पोटॅटो) यासारखी झाली आहे. कोरोनाची भीती व सतत मोबाईलवर काम केल्याने अनेकांना निद्रानाश झाला आहे. (many people suffer from insomnia due to constant mobile use)

मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोनाने माणसाच्या जीवनशैलीची दाणादाण उडविली आहे. लहान मुलांपासून, युवक, नोकरदार, कामगार, व्यावसायिक, वयोवृद्ध, अशा सगळ्याच घटकांतील नागरिकांना घरात बंदिस्त केले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ने दिवस अन्‌ रात्रीत काही फरक उरला नाही.

ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसनच लागले आहे. दिवसातून आठ ते दहा तास ऑनलाइन शिक्षण घेण्यावर जातात. (शाळेतील ऑनलाइन वर्ग, ट्यूशन, इतर क्लासेस मिळून). ऑनलाइन वर्ग झाला, की टीव्ही नाही तर मोबाईल पाहात बसण्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही. आली तर ती व्यवस्थित लागत नाही, अशा निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्या आहेत.

झोप घेत घेणारा व्यक्ती


झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
*दिवसभर आळस, नैराश्‍य
*मानसिक ताणतणावात वाढ
*मेंदूचा निष्क्रियपणा वाढला
*रक्तदाब, मधुमेह आजार वाढले

झोप उडण्याचे कारण

झोप का उडते?
*प्रमाणपेक्षा अधिक मोबाईल व टीव्ही पाहणे
*नियमित होणारी शरीराची हालचाल थांबणे
*व्यायामाचा अभाव
*ताणतणाव, अस्वस्थ मन
*अनामिक भीती
*या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही
*हतबलता

निद्रा उडालेला व्यक्ती

कोणाला किती वेळ झोप हवी...
*नवजात बालक : १६ ते १८ तास
*एक ते पाच वर्षे : दहा ते १२ तास
*शाळेत जाणारी मुले : आठ ते दहा तास
*२१ ते ६० वर्षे : सहा ते आठ तास

योग


चांगली झोप येण्यासाठी...
*किमान एक तास व्यायाम, योगासने करा
*दिवसभर स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून ठेवा
*कॅरम, पत्ते, बुद्धिबळासारखे खेळ खेळा
*कायम सकारात्मक विचार करा
*वाचन, गाणी ऐकणे, पुस्तक वाचनाचा छंद जोपासा

झोप चांगली येण्यासाठी मोबाईल, टीव्हीवरचा कमीत कमी वापर करावा. अर्धा तासांनी डोळ्यांना विश्रांती द्यावी. किमान रोज एक तास व्यायाम, योगासने, वॉकिंग केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय विश्‍वास ठेवू नये. दिवस कामात गेला, की रात्री शांत झोप लागते.
-डॉ. स्नेहल फेगडे, सदस्य, सर्जन ऑफ इंडिया असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT